TRENDING:

मानलं गड्या! दूध शिल्लक राहिलं, पांडुरंगनं डोकं लावलं, आता फेमस ब्रँड अन् 25 लाखांचा टर्नओव्हर, Video

Last Updated:

Business Success: शेतकऱ्यांकडून चिकू, सीताफळ, आंबा, जांभूळ यासारखी फळे विकत घेऊन त्याच्या पल्पपासून कुल्फी निर्मिती सुरू केली.

advertisement
जालना: नोकरीच्या संधी अल्प प्रमाणात उपलब्ध असल्याने तरुण वर्ग उद्योग व्यवसायाकडे वळत आहेत. बीड जिल्ह्यातील गेवराई येथील एका तरुणाने फळांच्या पल्पपासून कुल्फी निर्मितीचा अनोखा व्यवसाय सुरू केलाय. या व्यवसायाच्या माध्यमातून हा तरुण वार्षिक 25 ते 30 लाखांची उलाढाल करतोय. लोकल18 च्या माध्यमातून पांडुरंग मोहिते यांची यशोगाथा जाणून घेऊ.
advertisement

बीड जिल्ह्यातील गेवराई येथील एका छोट्याशा खेडेगावातील पांडुरंग मोहिते यांचा मागील अनेक वर्षांपासून दुग्ध व्यवसाय आहे. त्याचबरोबर छोटेशी हॉटेल देखील आहे. पावसाळा आणि हिवाळ्यामध्ये दुधाची विक्री चांगल्या प्रमाणात व्हायची, परंतु उन्हाळ्यामध्ये विक्री होऊन देखील काही प्रमाणात दूध शिल्लक राहायचं.

पांडुरंगने शिल्लक राहिलेल्या दुधाचं काय करायचं म्हणून त्यापासून कुल्फी तयार करून पाहिली. हा प्रयोग यशस्वी झाला. 2022 मध्ये सुरू केलेल्या या प्रयोगाला त्याच वर्षी खूप चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे व्यावसायिक दृष्टिकोनातून या व्यवसायात येण्याचे त्यांनी ठरवलं.

advertisement

मराठवाड्यातील शेतकऱ्याची कमाल, खडकाळ माळावर पिकवल ‘सोनं’, 30 गुंठ्यात कमाई लाखात

चार लाखांची मशिनरी खरेदी केली तसेच दोन लाखांचं ट्रान्सपोर्ट वाहन देखील खरेदी केलं. अशी सहा लाखांची गुंतवणूक केली. शेतकऱ्यांकडून चिकू, सीताफळ, आंबा, जांभूळ यासारखी फळे विकत घेऊन त्याच्या पल्पपासून कुल्फी निर्मिती सुरू केली.

फळांपासून बनवतात विविध प्रकारच्या कुल्फी

advertisement

सध्या मोहिते यांच्याकडे जवळपास सात ते आठ वेगवेगळ्या प्रकारच्या कुल्फी मिळतात. फळांच्या पल्पपासून तयार केलेल्या कुल्फी या 30 रुपयांना आहेत, तर इतर कुल्फी 10 ते 20 रुपयांच्या दरम्यान आहेत. होलसेल ग्राहकाला 30 रुपये किमतीची कुल्फी 21 रुपये प्रति नगाने मिळते. तसेच 30 रुपये कॉस्टिंग असलेल्या कुल्फीची मेकिंग कॉस्ट 16 ते 17 रुपये आहे.

advertisement

कमाई किती?

दरम्यान, होलसेल विक्रीतून एका कुल्फीमागे पाच ते सहा रुपये तर किरकोळ विक्रीतून एका कुल्फीमागे 13 ते 14 रुपये निव्वळ नफा राहतो. वार्षिक 25 ते 30 लाखांची उलाढाल होऊन 12 ते 15 लाखांचे निव्वळ उत्पन्न हाती येते, असं पांडुरंग मोहिते यांनी लोकल18 सोबत बोलताना सांगितलं.

मराठी बातम्या/मनी/
मानलं गड्या! दूध शिल्लक राहिलं, पांडुरंगनं डोकं लावलं, आता फेमस ब्रँड अन् 25 लाखांचा टर्नओव्हर, Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल