झारखंडची राजधानी रांची येथील राजभवनात गेल्या 30 वर्षांपासून एक दालचिनीचा वृक्ष उभा आहे. खुद्द महामहिम राज्यपाल देखील याच झाडाची साल चहामध्ये वापरतात. पण हा वृक्ष फक्त राजभवनातच नाही, तर तुमच्या बागेत किंवा अगदी कुंडीतही वाढू शकतो. चला तर मग जाणून घेऊया, दालचिनीच्या शेतीतून मालामाल होण्याचे गुपित.
दालचिनीची मागणी केवळ भारतातच नाही, तर परदेशातही प्रचंड आहे. विशेषतः मसाला कंपन्या याच्या शोधात असतात. कृषी तज्ज्ञांच्या मते, तुम्ही तुमच्या घरात एका मोठ्या कुंडीतही याची लागवड करू शकता.
advertisement
दालचिनीसाठी कुंडीचा आकार थोडा मोठा असावा. केवळ शेणखतावर अवलंबून न राहता, थोडे युरिया आणि डीएपी (DAP) वापरल्यास झाडाचे पोषण चांगले होते. तसेच मातीत थोडे चुना मिसळल्यास वाढीला मदत होते.
जेव्हा रोपाचे रूपांतर झाडात होते...
जेव्हा तुमचे दालचिनीचे रोप साधारण 15 इंचांचे होईल, तेव्हा त्याला कुंडीतून काढून जमिनीत लावणे आवश्यक आहे. कारण या झाडाची मुळे वेगाने पसरतात. कुंडीत जागा कमी पडल्यास रोप सुकू शकते.
अनेकजण झाडाला सकाळी-संध्याकाळी पाणी घालतात, पण दालचिनीला याची गरज नसते. माती सुकलेली असेल तरच 3 दिवसातून एकदा पाणी द्यावे. अति पाण्यामुळे मुळे कुजण्याची भीती असते.
कंपन्या स्वतःहून येतील तुमच्या दारी
दालचिनीच्या शेतीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे याच्या विक्रीसाठी तुम्हाला बाजारात भटकण्याची गरज पडत नाही. जर तुमची दालचिनी दर्जेदार असेल, तर MDH किंवा Catch सारख्या नामांकित मसाला कंपन्या थेट तुमच्याशी संपर्क साधून माल खरेदी करतात.
कमी खर्च, अफाट कमाई
दालचिनीच्या झाडाचे वैशिष्ट्य म्हणजे एकदा साल काढल्यानंतर अवघ्या 40 दिवसांत तिथे पुन्हा नवीन साल येते.
हे झाड 15-20 वर्षांत अवाढव्य होते. एकदा लावलेले झाड तुम्हाला पुढील अनेक वर्षे उत्पन्न देत राहते. म्हणूनच याला 'कमी खर्चात जास्त नफा देणारा खजिना' म्हटले जाते.
जर तुमच्याकडे थोडी मोकळी जागा असेल किंवा बागेची आवड असेल, तर दालचिनीचे एक रोप नक्की लावा. हे केवळ तुमच्या घराला सुगंध देणार नाही, तर भविष्यात तुमच्या उत्पन्नाचे एक भक्कम साधनही ठरेल.
