TRENDING:

Kidney Disease : किडनी विकारांच्या रुग्णांची वाढतेय संख्या, 'ही' आहेत प्रमुख कारणं

Last Updated:

किडनीच्या समस्यांमागची कारणं जाणून घेतली तर त्यावर उपाय शोधणं आणि किडनीचं आरोग्य सांभाळणं शक्य होऊ शकतं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
शरीरातून नको असलेले घटक वेगळे करण्यासाठी तसंच जास्तीचं पाणी बाहेर काढून टाकण्यासाठी किडनी हा अवयव महत्त्वाचं काम करतो. त्यामुळे किडनीचं आरोग्य जपलं, तर एकंदर स्वास्थ्यही उत्तम राहतं. मात्र काही आजार, पोषणमूल्यांची कमतरता आणि पाणी कमी प्यायल्यानं किडनीच्या समस्या उद्भवू शकतात. काहीवेळा किडनी निकामीही होऊ शकतात. किडनीच्या समस्यांमागची कारणं जाणून घेतली तर त्यावर उपाय शोधणं आणि किडनीचं आरोग्य सांभाळणं शक्य होऊ शकतं.
किडनी विकारांच्या रुग्णांच वाढतंय प्रमाण, 'ही' आहेत प्रमुख कारणं
किडनी विकारांच्या रुग्णांच वाढतंय प्रमाण, 'ही' आहेत प्रमुख कारणं
advertisement

डायबेटिस प्रमुख कारण : 

किडनीचं आरोग्य बिघडण्यामागचं एक प्रमुख कारणं डायबेटिस हा आजार असतो. “रक्तातल्या साखरेचं प्रमाण सतत वाढलेलं राहण्यानं किडनीतल्या रक्तवाहिन्यांना ईजा होते. त्यामुळे डायबेटिक नेप्रोपॅथीची समस्या उद्भवते. यात किडनीचं कार्यचं प्रभावित होतं,” असं हैदराबादच्या बंजारा हिल्स इथल्या केअर हॉस्पिटलमधील नेफ्रॉलॉजिस्ट आणि ट्रान्सप्लांट फिजिशियन डॉ. संतोष हेदऊ यांचं म्हणणं आहे. त्यासाठी डायबेटिसच्या रुग्णांनी त्यांच्या रक्तातल्या साखरेवर नियंत्रण ठेवलं पाहिजे. धान्य, फळं, भाज्या, प्रथिनयुक्त अन्न यासारखा संतुलित आहार घेतला पाहिजे. नियमित व्यायाम केला पाहिजे. डॉक्टरांच्या सल्ल्यानं नियमित तपासण्या करून वेळेवर औषधोपचार घेतले पाहिजेत.

advertisement

उच्च रक्तदाब : 

उच्च रक्तदाब हेही किडनीच्या समस्यांचं एक कारण असू शकतं. यामुळे किडनी हळूहळू खराब होत जाते. त्यासाठी रक्तदाब नियंत्रणात ठेवणं जरूर असतं. उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी नियमित व्यायाम तसंच आहारात कमी मिठाचं सेवन याकडे लक्ष दिलं पाहिजे. दारू आणि सिगारेटचं व्यसन कमी केलं पाहिजे.

डिहायड्रेशन : 

शरीराला आवश्यक तेवढ्या प्रमाणात द्रव पदार्थ मिळाले नाहीत, तर किडनीचं कार्य प्रभावित होऊ शकतं. म्हणूनच पाणी भरपूर पिण्याचा, शक्य तेवढे द्रव पदार्थ आहारात घेण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. प्रत्येक व्यक्तीची प्रकृती, वय, लिंग या वरून पाण्याची गरज कमी जास्त होते. पण साधारणपणे दिवसाला 8 कप पाणी पिणं हिताचं ठरतं.

advertisement

पेनकिलर्सचा अतिरेक  : 

इबुप्रोफेन, अ‍ॅस्प्रिन अशी पेनकिलर्स किंवा काही नॉनस्टेरॉयडल अँटीइन्फ्लेमेटरी औषधं (NSAIDs) किडनीच्या आरोग्याला धोका निर्माण करू शकतात. अर्थात या औषधांचा खूप जास्त काळासाठी वापर झाला तरच असा धोका असतो. यात किडनीतला रक्ताचा पुरवठा कमी होतो यामुळे दोन्ही किडनी खराब होतात, असं डॉ. हेदऊ यांचं म्हणणं आहे. हे टाळण्याकरता पेनकिलर्स किंवा इतर घातक औषधं डॉक्टरांच्या सल्ल्यानं आणि मर्यादेतच घ्यावीत. पेनकिलर्सची जास्त कालावधीसाठी आवश्यकता असेल, तर त्यावर दुसऱ्या पर्यायी औषधांबाबत डॉक्टरांशी चर्चा करावी.

advertisement

दारू व धूम्रपान : 

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
दाळ शिजण्याचं टेन्शन संपलं, सोलापूरच्या गृहिणीची कमाल, पुरणपोळीसाठी बनवलं प्रिमिक्स, पाहा काय करायचं?
सर्व पहा

सिगारेट व अतिप्रमाणात दारूचं व्यसनही किडनी खराब करतं. त्यावर मात करण्यासाठी हे व्यसन सोडवायचे प्रयत्न केले पाहिजेत. चांगली जीवनशैली आत्मसात केली पाहिजे. किडनीचं आरोग्य जपण्यासाठी प्रत्येकानंच काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी संतुलित आहार घेणं, नियमित व्यायाम करणं, प्रथिनयुक्त व कमी आहार घेणं, किडनीच्या कार्याविषयी नियमित तपासण्या करणं आणि किडनीला घातक ठरणारी रसायनं किंवा घटकांचा वापर टाळणं हे केल्यास किडनीच आरोग्य जपता येऊ शकतं.

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Kidney Disease : किडनी विकारांच्या रुग्णांची वाढतेय संख्या, 'ही' आहेत प्रमुख कारणं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल