आज आम्ही तुम्हाला घराच्या घरी हर्बल रंग कसे बनवायचे याबद्दल महिती देत आहोत. हे रंग घरी बनवणं अगदी सोपं आहे. तुम्हाला फक्त एकही वेगवेगळ्या रंगांची विशिष्ट फुलं लागतील. चला तर मग पाहूया घरीच हर्बल रंग कसे बनवायचे..
या फुलांच्या मदतीने बनवा हर्बल रंग..
झेंडूचे फुल
झेंडूच्या रंगांप्रमाणेच या फुलांपासून तुम्ही पिवळा रंग बनवू शकता. पिवळा रंग आनंद आणि उत्साहाचे प्रतीक आहे. झेंडूच्या फुलांपासून बनवलेला रंग त्वचेसाठी सुरक्षित असतो आणि त्याला सौम्य सुगंध असतो.
advertisement
असा बनवा पिवळा रंग : पिवळा रंग बनवण्यासाठी आधी झेंडूच्या फुलांच्या पाकळ्या वेगळ्या करा. त्या कडक उन्हात चांगल्या वाळवा. वाळल्यानंतर त्या मिक्सरमध्ये बारीक करून बारीक पावडर बनवा. अधिक पिवळा रंग मिळविण्यासाठी तुम्ही त्यामध्ये थोडी हळद घालू शकता. प्रमाण वाढवण्यासाठी थोडे कॉर्नफ्लोअर घाला.
गुलाबाचे फुल
रंगांच्या दुनियेत गुलाबी रंगला विशेष महत्त्व आहे. हा रंग जवळपास सारा जणांना आवडतो आणि सर्वना आनंद देतो. त्यामुळे रंगांच्या सणात हा रंग तर बनवायलाच हवा. गुलाबी रंग बनवण्यासाठी तुम्ही गुलाबाच्या फुलांचा वापर करू शकता.
असा बनवा गुलाबी रंग : गुलाबी रंग बनवण्यासाठी गुलाबाच्या पाकळ्या उन्हात वाळवा. वाळल्यानंतर त्यांची बारीक पावडर बनवा. तुम्हाला ओला रंग बनवायचा असेल तर गुलाबाच्या पाकळ्या रात्रभर पाण्यात भिजवा. दुसऱ्या दिवशी हे पाणी हलके उकळवा. तुम्हाला गडद गुलाबी रंगाचे पाणी मिळेल, जे मुलांसाठी देखील सुरक्षित असते.
अपराजिताचे फुल
अपराजिताची निळी फुले नैसर्गिक निळा रंग बनवण्यासाठी उत्कृष्ट मानली जातात. रंगपंचंमीला तुम्हाला निळा रंग बनवायचा असेल तर तुम्ही ही फुलं वापरू शकता. ही फुल आपल्या त्वचेसोबतच आरोग्यासाठीही फायदेशीर असतात.
असा बनवा निळा रंग : निळा रंग बनवण्यासाठी गरम पाण्यात फक्त ताजी किंवा वाळलेली अपराजिता फुले घाला. काही मिनिटांतच पाणी गडद निळे होईल. कोरडा रंग बनवण्यासाठी फुले पूर्णपणे वाळवा. नंतर बारीक करून पावडर बनवा. त्यात तुम्ही थोडे पीठ किंवा अॅरोरूट पावडर घालू शकता.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
