advertisement

Success Story : पारंपरिक पिकाला दिला फाटा, चिया सीड्स शेतीचा यशस्वी प्रयोग, उत्पन्न लाखात

Last Updated:

शेतीमध्ये शेतकरी वेगवेगळे नाविन्यपूर्ण प्रयोग सातत्याने करत राहतात. जालन्यातील प्रल्हाद गाडे यांनी आपल्या एक एकर शेतामध्ये चिया सीड शेतीचा नाविन्यपूर्ण प्रयोग केला आहे.

+
चिया

चिया शेती

जालना : शेतीमध्ये शेतकरी वेगवेगळे नाविन्यपूर्ण प्रयोग सातत्याने करत राहतात. जालन्यातील प्रल्हाद गाडे यांनी आपल्या एक एकर शेतामध्ये चिया सीड शेतीचा नाविन्यपूर्ण प्रयोग केला आहे. या शेतीच्या माध्यमातून त्यांना पाच ते सहा क्विंटल चिया सीड्स उत्पादन होणार असून एक लाखांपेक्षा अधिकचा नफा केवळ तीन महिन्यांमध्ये मिळणार आहे. पाहुयात कशा पद्धतीने प्रल्हाद गाडे यांनी या शेतीचे नियोजन केले.
जालना जिल्ह्यातील भाटेपुरी हे प्रल्हाद गाडे यांचं गाव. 16 एकर वडिलोपार्जित शेती. दोघे भाऊ मिळून ही शेती करत असतात. शेतामध्ये सोयाबीन, कापूस यांसारखी पारंपरिक पिके नेहमीच घेतली जातात. परंतु बापखळ येथील एका शेतकऱ्याने केलेला चिया सीड शेतीचा प्रयोग प्रल्हाद यांना आवडला. त्यांनी याच शेतकऱ्याकडून दीड किलो बियाणे खरेदी केले.
advertisement
या बियाण्याची ट्रॅक्टरद्वारे पेरणी केली. एकरी केवळ दीड किलो बियाणे वापरले. पेरणीसाठी त्यामध्ये भाजलेले बाजरी वापरले. जेणेकरून पेरणी व्यवस्थित व्हावी. पीक उगवून आल्यानंतर आतापर्यंत या पिकाला पाच पाणी देण्यात आले. एक वेळा साध्या कीटकनाशकाची फवारणी करण्यात आली, तर एक वेळा खताचा डोस देण्यात आला. सध्या हे पीक बहारात असून या पिकाच्या माध्यमातून त्यांना पाच ते सहा क्विंटल उत्पादन अपेक्षित आहे.
advertisement
काहीतरी वेगळं करायचं म्हणून चिया सीड्सची लागवड केली. सुरुवातीचा एक महिना शेतामध्ये मन लागत नव्हतं. पंधरा दिवसांनी खत टाकले आणि पाणी दिले, त्यानंतर पीक चांगलं जोमदार दिसू लागलं. आता मात्र पीक अगदी बहरात आहे. हा नवीनच प्रयोग असून यंदा पाच ते सहा क्विंटल उत्पादन होईल आणि एक लाखापर्यंत उत्पन्न मिळेल. शेतकऱ्यांनी वेगवेगळे प्रयोग जर केले तर शेतीमध्ये देखील चांगलं उत्पन्न मिळतं, असं प्रल्हाद गाढे यांनी लोकल 18 शी बोलताना सांगितलं.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
Success Story : पारंपरिक पिकाला दिला फाटा, चिया सीड्स शेतीचा यशस्वी प्रयोग, उत्पन्न लाखात
Next Article
advertisement
SL vs ENG : इंग्लंडचा चमत्कारीक विजय, श्रीलंका पाकिस्तान पैकी एक टीम 100 टक्के बाहेर जाणार, दुसऱ्या मॅचनंतर समीकरण बदलणार
इंग्लंडचा चमत्कारीक विजय, श्रीलंका पाकिस्तान पैकी एक टीम 100 टक्के बाहेर जाणार,
  • इंग्लंडच्या विजयाने समीकरण बदललं

  • पाकिस्तान वर्ल्डकप मधून बाहेर होणार

  • यजमान श्रीलंकेचही काही खरं नाही

View All
advertisement