advertisement

IND vs SA : साऊथ अफ्रिकाविरुद्ध प्लॅन 'बाबर' फेल! टॉसच्या आधीच ठरला होता टीम इंडियाचा पराभव, गंभीर अन् सूर्याकडून घोडचूक!

Last Updated:

IND vs SA, Axar Patel : अक्षर पटेलला संघातून वगळण्याचा निर्णय चुकीचा होता, अशी कबुली टीम इंडियाचे सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डेश्काटे यांनी दिली आहे.

IND vs SA Axar patel dropped was team india big mistake
IND vs SA Axar patel dropped was team india big mistake
India vs south Africa : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पुन्हा जुन्या जखमी ताज्या झाल्या. रोहित शर्माचं दु:ख सूर्याला देखील भोगावं लागलं. नरेंद्र मोदी स्टेडियमवर पुन्हा टीम इंडियाच्या नशिबी पराभव आला आहे. साऊथ अफ्रिकेने 76 धावांनी विजय मिळवला अन् 2024 च्या पराभवाचा बदला घेतला आहे. अशातच आता साऊथ अफ्रिकेविरुद्ध टीम इंडिया एक चूक महागात पडली, ज्याची जाणीव आता टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममध्ये व्यक्त केली जात आहे. टीम इंडियाचा बाबर प्लॅन फेल ठरला आहे.

गंभीरने लाडक्या वॉशिंग्टन सुंदरला खेळवलं

टीम इंडियासाठी साऊथ अफ्रिकाविरुद्धचा सामना महत्त्वाचा होता. पण टॉस होण्याआधीच गौतम गंभीर अन् सूर्यकुमार यादवने जो निर्णय घेतला, त्यामुळे साऊथ अफ्रिकेच्या हातात सामना पोहोचला. तो निर्णय होता... अक्षर पटेलला वगळण्याचा. टीम इंडियाचा व्हाईस कॅप्टन अक्षर पटेल याला बाहेर बसवून गौतम गंभीरने लाडक्या वॉशिंग्टन सुंदरला खेळवलं. पण तो पूर्णपणे अपयशी ठरल्याचं पहायला मिळतंय.
advertisement

ब्रेव्हिस आणि मिलरविरुद्ध अक्षर पटेल निर्णायक

टीम इंडियाचा प्लॅन बाबर पूर्णपणे फेल झाला. भारत आणि पाकिस्तानच्या सामन्यात जेव्हा टीम इंडियाला विकेटची गरज होती, त्यावेळी मिडल ओव्हरमध्ये अक्षर पटेलने कमबॅक करत दोन विकेट काढल्या होत्या. त्यात बाबर आझमचा समावेश होता. साऊथ अफ्रिकेच्या ब्रेव्हिस आणि मिलरविरुद्ध अक्षर पटेल निर्णायक ठरला आहे. जिथं कमी तिथं आम्ही अशी भूमिका अक्षर पटेल नेहमी बजावताना दिसतो. त्यामुळे अक्षर पटेलला प्लेईंग इलेव्हनमधून ड्रॉप करणं टीम इंडियाला महागात पडलं. त्यावर टीम इंडियाच्या कोचने देखील कबुली दिली आहे.
advertisement

रायन टेन डेश्काटे यांनी दिली कबुली

दरम्यान, आम्ही टीम कॉम्बिनेशन ठरवताना खूप चर्चा केली. पण आता मागे वळून पाहिल्यावर तो निर्णय चुकीचा वाटतो, असं रायन टेन डेश्काटे यांनी म्हटलंय. तसेच अक्षरबद्दल काहीही कमी लेखायचं नाही. आम्ही निराश आहोत. कुणीही तुम्हाला वर्ल्ड कप सहज देणार नाही. एक चूक परवडू शकते. मात्र खेळाडू जोरदार पुनरागमन करू शकतात. पुढे दोन मोठे सामने आहेत, त्यामुळे आम्ही चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करून असंही रायन टेन डेश्काटे यांनी म्हटलं आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs SA : साऊथ अफ्रिकाविरुद्ध प्लॅन 'बाबर' फेल! टॉसच्या आधीच ठरला होता टीम इंडियाचा पराभव, गंभीर अन् सूर्याकडून घोडचूक!
Next Article
advertisement
SL vs ENG : इंग्लंडचा चमत्कारीक विजय, श्रीलंका पाकिस्तान पैकी एक टीम 100 टक्के बाहेर जाणार, दुसऱ्या मॅचनंतर समीकरण बदलणार
इंग्लंडचा चमत्कारीक विजय, श्रीलंका पाकिस्तान पैकी एक टीम 100 टक्के बाहेर जाणार,
  • इंग्लंडच्या विजयाने समीकरण बदललं

  • पाकिस्तान वर्ल्डकप मधून बाहेर होणार

  • यजमान श्रीलंकेचही काही खरं नाही

View All
advertisement