advertisement

छंद असावा तर असा, प्रभाकर यांनी दुर्मिळ नाण्यांचा केला संग्रह, काय आहे खास? Video

Last Updated:

वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी गोळा केलेल्या आहेत, तसेच त्यांना नाणी गोळा करण्याची देखील खूप आवड आहे. तर त्यांनी भरपूर अशी नाणी गोळा केलेली आहेत.

+
प्रभाकर

प्रभाकर बुरांडे यांच्याकडे आहे दुर्मिळ नाण्यांचा संग्रह

छत्रपती संभाजीनगर : आपल्यापैकी अनेकांना कुठला ना कुठलातरी छंद असतो. कोणी नाणी गोळा करतात तर कोणी टपाल तिकीट गोळा करतात, तर कोणी वेगवेगळ्या आकर्षक गोष्टी गोळा करतात. छत्रपती संभाजीनगर शहरातील प्रभाकर बुरांडे यांना देखील असाच छंद आहे. त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी गोळा केलेल्या आहेत, तसेच त्यांना नाणी गोळा करण्याची देखील खूप आवड आहे. तर त्यांनी भरपूर अशी नाणी गोळा केलेली आहेत.
प्रभाकर बुरांडे हे शहरातील सातारा परिसरामध्ये राहतात. त्यांना लहानपणापासूनच वेगवेगळ्या प्रकारची नाणी गोळा करण्याचा छंद आहे. त्यांनी आतापर्यंत भरपूर अशी नाणी गोळा केलेली आहेत. यामध्ये त्यांच्याकडे शिवकालीन नाणी, तसेच निजामकालीन आणि एकाना, चाराने, आठना अशी सर्व प्रकारची नाणी त्यांच्याकडे आहेत. त्यासोबतच आरबीआय काही नाणी काढत असते, म्हणजे काही विशिष्ट नाणी आरबीआय हे पब्लिश करत असते, तर त्यापैकी पण काही नाणी त्यांनी संग्रहित केलेली आहेत. ही नाणी सर्वांकडे नसतात, आपण ती विकत घेऊ शकतो, त्यापैकीच त्यांनीही नाणी त्यांच्याकडे संग्रहासाठी ठेवलेली आहेत.
advertisement
या नाण्यांबरोबर त्यांच्याकडे अनेक अशा नोटा देखील आहेत, म्हणजे यामध्ये भारतातल्या सर्व ज्या नोटा आहेत त्या देखील आहेत. आणि बाहेर देशातील काही नोटा देखील त्यांच्याकडे आहेत. यामध्ये नेपाळ, दुबई, थायलंड अशा देशातील देखील नोटा त्यांनी गोळा केलेल्या आहेत. त्यांनी ही नाणी अशीच कुठून कुठून गोळा केलेली आहेत, म्हणजे त्यांचे जे मित्र आहेत त्यांनी त्यांना काही दिलेले आहेत किंवा इतरही काही ओळखीतल्या लोकांनी त्यांना ही सर्व नाणी संग्रहासाठी दिलेली आहेत. अशाप्रकारे त्यांच्याकडे भरपूर अशी नाणी आहेत.
advertisement
भविष्यामध्ये हा जो नाण्यांचा संग्रह आहे, त्यांना तो वाढवायचा आहे आणि सर्वसामान्य नागरिकांना तो दाखवायचा आहे. जेणेकरून जी लहान मुलं आहेत, कधी तरुण आहेत, त्यांना नाणी कशी होती किंवा कुठ कुठल्या प्रकारची नाणी आपल्याकडे आहेत हे सर्व दाखवायचं आहे, असं प्रभाकर बुरांडे यांनी सांगितले आहे.
view comments
मराठी बातम्या/छ. संभाजीनगर/
छंद असावा तर असा, प्रभाकर यांनी दुर्मिळ नाण्यांचा केला संग्रह, काय आहे खास? Video
Next Article
advertisement
SL vs ENG : इंग्लंडचा चमत्कारीक विजय, श्रीलंका पाकिस्तान पैकी एक टीम 100 टक्के बाहेर जाणार, दुसऱ्या मॅचनंतर समीकरण बदलणार
इंग्लंडचा चमत्कारीक विजय, श्रीलंका पाकिस्तान पैकी एक टीम 100 टक्के बाहेर जाणार,
  • इंग्लंडच्या विजयाने समीकरण बदललं

  • पाकिस्तान वर्ल्डकप मधून बाहेर होणार

  • यजमान श्रीलंकेचही काही खरं नाही

View All
advertisement