advertisement

IND vs SA : अक्षर पटेलला ड्रॉप का केलं? टीम इंडियाने अखेर कबुल केली चूक! असिस्टंट कोचने प्रेस कॉन्फरेन्समध्ये सांगितलं कारण

Last Updated:

Ryan Ten doeschate Statement : टीम इंडियाचे असिस्टंट कोच रायन टेन डोशेट यांनी या पराभवानंतर आपली चूक मान्य केली आहे. त्यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितले की, आम्ही टीम कॉम्बिनेशन ठरवताना खूप चर्चा केली.

India assistant coach Ryan Ten doeschate Admited Mistake
India assistant coach Ryan Ten doeschate Admited Mistake
India vs south Africa, T20 WC : भारतीय क्रिकेट टीमला टी-20 वर्ल्ड कप 2026 च्या सुपर 8 मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. या मॅचमध्ये टीम इंडियाने व्हाईस कॅप्टन अक्षर पटेल याला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर ठेवल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. विशेष म्हणजे, ही मॅच पटेलच्या घरच्या मैदानावर होती, तरीही त्याला बेंचवर बसवण्याचा निर्णय टीमसाठी घातक ठरला आणि भारताला 76 रन्सनी हार पत्करावी लागली. अशातच आता टीम इंडियाने भर प्रेस कॉन्फरेन्समध्ये चूक मान्य केली आहे.

असिस्टंट कोचने चूक मान्य केली

टीम इंडियाचे असिस्टंट कोच रायन टेन डोशेट यांनी या पराभवानंतर आपली चूक मान्य केली आहे. त्यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितले की, आम्ही टीम कॉम्बिनेशन ठरवताना खूप चर्चा केली. पण आता मागे वळून पाहिल्यावर तो निर्णय चुकीचा वाटतो, असं रायन टेन डेश्काटे यांनी म्हटलंय. तसेच अक्षरबद्दल काहीही कमी लेखायचं नाही. आम्ही निराश आहोत, असंही रायन टेन डोशेट यांनी म्हटलं आहे.
advertisement

वर्ल्ड कप सहज देणार नाही

कुणीही तुम्हाला वर्ल्ड कप सहज देणार नाही. एक चूक परवडू शकते. मात्र खेळाडू जोरदार पुनरागमन करू शकतात. पुढे दोन मोठे सामने आहेत, त्यामुळे आम्ही चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करून असं देखील रायन टेन डेश्काटे यांनी म्हटलं आहे.

मोठ्या विजयाची नितांत गरज

advertisement
दरम्यान, भारताला आता आपले पुढचे दोन सामने झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिजविरुद्ध खेळायचे आहेत. सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी टीम इंडियाला केवळ या दोन्ही मॅच जिंकायच्या नाहीत, तर एक मॅच मोठ्या फरकाने जिंकणे अनिवार्य आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मोठ्या पराभवामुळे टीमचा नेट रन रेट खूपच खराब झाला असून, तो सुधारण्यासाठी मोठ्या विजयाची नितांत गरज आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs SA : अक्षर पटेलला ड्रॉप का केलं? टीम इंडियाने अखेर कबुल केली चूक! असिस्टंट कोचने प्रेस कॉन्फरेन्समध्ये सांगितलं कारण
Next Article
advertisement
SL vs ENG : इंग्लंडचा चमत्कारीक विजय, श्रीलंका पाकिस्तान पैकी एक टीम 100 टक्के बाहेर जाणार, दुसऱ्या मॅचनंतर समीकरण बदलणार
इंग्लंडचा चमत्कारीक विजय, श्रीलंका पाकिस्तान पैकी एक टीम 100 टक्के बाहेर जाणार,
  • इंग्लंडच्या विजयाने समीकरण बदललं

  • पाकिस्तान वर्ल्डकप मधून बाहेर होणार

  • यजमान श्रीलंकेचही काही खरं नाही

View All
advertisement