advertisement

Shiv Sena Shinde NCP Ajit Pawar: बीएमसीत पाठिंब्याची किंमत शिंदे गटाला चुकवावी लागणार, राष्ट्रवादीनं खिंडीत गाठलं?

Last Updated:

Shiv Sena Shinde NCP Ajit Pawar : तीन नगरसेवक असलेल्या राष्ट्रवादी अजित पवार गटाला शिंदे गटानं गळ घालून पाठिंबा पदरात पाडून घेतला. मात्र, आता त्याची परतफेड करावी लागणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

बीएमसीत पाठिंब्याची किंमत शिंदे गटाला चुकवावी लागणार, राष्ट्रवादीनं खिंडीत गाठलं?
बीएमसीत पाठिंब्याची किंमत शिंदे गटाला चुकवावी लागणार, राष्ट्रवादीनं खिंडीत गाठलं?
सुमित सावंत, प्रतिनिधी, मुंबई: मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेना शिंदे गटाला काठावरचं बहुमत मिळालं. मुंबई महापालिकेतील स्थायी समिती आणि इतर महत्त्वाच्या समितींमध्ये संख्याबळ वाढवण्यासाठी तीन नगरसेवक असलेल्या राष्ट्रवादी अजित पवार गटाला शिंदे गटानं गळ घालून पाठिंबा पदरात पाडून घेतला. मात्र, आता त्याची परतफेड करावी लागणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
विरोधकांचेही संख्याबळ समप्रमाणात होत असल्याने मोठा पेच निर्माण झाला होता. अशा वेळी शिंदे गटाने राष्ट्रवादीचा पाठिंबा घेतला. त्यामुळे विरोधकांच्या संख्याबळावर त्याचा परिणाम झाला.

स्वीकृत नगरसेवकपदावर पुन्हा वाद

मुंबई महानगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक पदांच्या निवडीवरून महायुतीमध्ये पडद्यामागे मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत. विशेष म्हणजे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाट्याला येणाऱ्या एका जागेवर आता राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) दावा ठोकल्याची माहिती समोर येत आहे. नवाब मलिक यांचे बंधू कप्तान मलिक यांना स्वीकृत नगरसेवक करण्यासाठी राष्ट्रवादीने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली असून, यामुळे महायुतीत नवा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.
advertisement

नेमकं प्रकरण काय?

मुंबई महापालिकेत सध्या प्रशासक राज असले तरी, स्वीकृत नगरसेवकांच्या जागा भरण्याच्या हालचालींना वेग आला आहे. महायुतीमधील जागावाटपाच्या सूत्रानुसार, शिंदे सेनेच्या वाट्याला दोन जागा येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) 'सहयोगी गट' म्हणून आपली भूमिका मांडत, यातील एक जागा आम्हाला मिळावी, अशी मागणी लावून धरली आहे.
advertisement

नवाब मलिकांच्या बंधूंची एन्ट्री

राष्ट्रवादी काँग्रेसकडून या पदासाठी माजी नगरसेवक कप्तान मलिक यांचे नाव आघाडीवर आहे. नवाब मलिक यांचे बंधू असलेल्या कप्तान मलिक यांच्यासाठी पक्षाने शिंदे सेनेकडे आग्रही मागणी केली आहे. "आम्ही महायुतीत सहयोगी म्हणून सोबत आहोत, त्यामुळे आमच्या प्रतिनिधीला संधी मिळणे न्यायकारक ठरेल," अशी भूमिका राष्ट्रवादीने घेतल्याचे समजते.
view comments
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
Shiv Sena Shinde NCP Ajit Pawar: बीएमसीत पाठिंब्याची किंमत शिंदे गटाला चुकवावी लागणार, राष्ट्रवादीनं खिंडीत गाठलं?
Next Article
advertisement
SL vs ENG : इंग्लंडचा चमत्कारीक विजय, श्रीलंका पाकिस्तान पैकी एक टीम 100 टक्के बाहेर जाणार, दुसऱ्या मॅचनंतर समीकरण बदलणार
इंग्लंडचा चमत्कारीक विजय, श्रीलंका पाकिस्तान पैकी एक टीम 100 टक्के बाहेर जाणार,
  • इंग्लंडच्या विजयाने समीकरण बदललं

  • पाकिस्तान वर्ल्डकप मधून बाहेर होणार

  • यजमान श्रीलंकेचही काही खरं नाही

View All
advertisement