Mumbai - Pune Expressway : गॅस टँकरचे ब्रेक अचानक फेल; मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर पुन्हा अपघात, पण यावेळी 'त्या' निर्णयानं संकटातून वाचवलं
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
सकाळी १० वाजण्याच्या सुमारास मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका गॅस टँकरचे अचानक ब्रेक फेल झाले. टँकरमध्ये गॅस असल्याने मोठा धोका निर्माण झाला होता.
(गणेश दुडम,प्रतिनिधी) मावळ : मुंबई-पुणे एक्सप्रेस-वे वर सोमवारी सकाळी १० च्या सुमारास अमृतांजन पुलाजवळ एका गॅस टँकरचा अपघात झाला. मात्र, महामार्ग पोलीस आणि प्रशासनाने दाखवलेल्या कमालीच्या तत्परतेमुळे या मार्गावर होणारी मोठी वाहतूक कोंडी टळली आहे. गेल्या वेळी झालेल्या ३२ तासांच्या कोंडीतून यंत्रणांनी मोठा धडा घेतल्याचे आजच्या कारवाईतून दिसून आले.
नेमकी घटना काय?
सकाळी १० वाजण्याच्या सुमारास मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका गॅस टँकरचे अचानक ब्रेक फेल झाले. टँकरमध्ये गॅस असल्याने मोठा धोका निर्माण झाला होता. मात्र, चालकाने अत्यंत प्रसंगावधान राखले आणि टँकर महामार्गावर पलटी होऊ न देता बाजूच्या डोंगराला धडकवला. सुदैवाने, टँकर पलटी झाला नाही आणि गॅस गळतीसारखा कोणताही गंभीर प्रकार घडला नाही.
advertisement
यंत्रणेची 'सुपरफास्ट' कारवाई
अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस आणि आयआरबी (IRB) प्रशासनाने क्षणाचाही विलंब न लावता घटनास्थळी धाव घेतली. मागील अनुभवातून धडा घेत यंत्रणांनी तातडीने क्रेन बोलावली आणि काही वेळातच टँकर सुरक्षितपणे बाजूला घेतला. या प्रक्रियेत वाहतूक काही काळासाठी संथ झाली होती, परंतु ती पूर्णपणे ठप्प होणार नाही याची काळजी पोलिसांनी घेतली.
advertisement
प्रवाशांनी व्यक्त केला आनंद
साधारणपणे वाहतूक कोंडीमुळे महामार्ग पोलिसांवर संताप व्यक्त करणारे प्रवासी यावेळी मात्र त्यांच्या कामावर खुश दिसले. अवघ्या काही वेळातच मार्ग मोकळा झाल्याने प्रवाशांनी सोशल मीडिया आणि प्रत्यक्ष पोलिसांचे कौतुक केले. "प्रशासनाने अशाच प्रकारे तत्परता दाखवली तर एक्सप्रेस-वे वरील प्रवासाचा ताण कमी होईल," अशा प्रतिक्रिया वाहनचालकांनी व्यक्त केल्या.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Feb 23, 2026 12:06 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Mumbai - Pune Expressway : गॅस टँकरचे ब्रेक अचानक फेल; मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर पुन्हा अपघात, पण यावेळी 'त्या' निर्णयानं संकटातून वाचवलं








