BMC Shiv Sena: मुंबई महापालिकेत हाय-व्होल्टेज ड्रामा! ठाकरेंचा नगरसेवक थेट शिंदेंच्या आमदाराच्या भेटीला, चर्चांना उधाण
- Written by:Shrikant Bhosale
Last Updated:
Shiv Sena BMC: राज्याचे आजपासून विधीमंडळाचे अधिवेशन सुरू होत असताना दुसरीकडे मुंबई महापालिकेत मोठी घडली. मुंबई महापालिकेत हाय व्होल्टेज घडामोड घडली.
सुमित सावंत, प्रतिनिधी, मुंबई: राज्याचे आजपासून विधीमंडळाचे अधिवेशन सुरू होत असताना दुसरीकडे मुंबई महापालिकेत मोठी घडली. मुंबई महापालिकेत हाय व्होल्टेज घडामोड घडली. ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू असताना ठाकरेंच्या नगरसेवकाने थेट शिंदेंच्या आमदाराची भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
मुंबई महानगरपालिकेत स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू असतानाच आज एक महत्त्वाची राजकीय घडामोड पाहायला मिळाली. ठाकरे गटाचे नगरसेवक अंकित प्रभू यांनी चक्क शिंदे गटाच्या महापालिकेतील पक्ष कार्यालयात जाऊन आमदार प्रकाश सुर्वे यांची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले असून, ठाकरेंचा मोहरा शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगली आहे.
advertisement
शुभेच्छा की राजकीय समीकरण?
या भेटीसाठी स्वीकृत नगरसेवक निवडीचे निमित्त होते. शिंदे सेनेकडून आज दोन सदस्यांची नावे निश्चित मानली जात आहेत, ज्यामध्ये आमदार प्रकाश सुर्वे यांचे सुपुत्र राज सुर्वे यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर अंकित प्रभू यांनी शिंदे सेनेच्या कार्यालयात हजेरी लावली. त्यांनी राज सुर्वे यांच्या संभाव्य नियुक्तीबद्दल आमदार प्रकाश सुर्वे यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. अंकित प्रभू हे ठाकरे गटाचे विधानसभा प्रतोद सुनिल प्रभू यांचे सुपुत्र आहेत. यंदा पहिल्यांदाच अंकित प्रभू हे मुंबई महापालिकेवर निवडून गेले आहेत.
advertisement
राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या
एकीकडे शिवसेना (ठाकरे गट) आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात तीव्र संघर्ष सुरू असताना, ठाकरे गटाच्या एका माजी नगरसेवकाने थेट विरोधी गटाच्या कार्यालयात जाऊन भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. जरी या भेटीला 'शुभेच्छा भेट' असे स्वरूप दिले जात असले, तरी मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुका पाहता यामागे काही वेगळी राजकीय गणिते दडली आहेत का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 23, 2026 12:18 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
BMC Shiv Sena: मुंबई महापालिकेत हाय-व्होल्टेज ड्रामा! ठाकरेंचा नगरसेवक थेट शिंदेंच्या आमदाराच्या भेटीला, चर्चांना उधाण








