advertisement

Tejashri Pradhan : कोणत्या वयात लग्न करायचं! 30शी च्या आधी की 30शी नंतर? तेजश्री प्रधानचा खास सल्ला

Last Updated:
Tejashri Pradhan on Marriage : अभिनेत्री तेजश्री प्रधानने लग्नाचं योग्य वय कोणतं याबद्दल सांगितलं. तिशीच्या आधी की तिशीनंतर लग्न करायचं? काय म्हणाली तेजश्री प्रधान?
1/7
लग्न कधी करायचं? लग्न करण्याचं योग्य वय कोणतं? असे अनेक प्रश्न अनेकांना अनेकदा पडले आहेत. काहींच्या मते वयाच्या तिशीआधी लग्न करणं उत्तम तर काहींच्या मते तिशीनंतर लग्न करणं उत्तम, तर काही म्हणतात, लग्न कोणत्याही वयात करा पण ते टिकलं तर जिंकलं. अभिनेत्री तेजश्री प्रधाननं यावर भाष्य केलं आहे. स्वत: वयाच्या पंचवीशीत लग्न करणाऱ्या तेजश्रीचं यावर काय म्हणणं आहे पाहूयात. 

2/7
लोकमत फिल्मीला दिलेल्या एका मुलाखतीत बोलताना तेजश्री म्हणाली होती,
लोकमत फिल्मीला दिलेल्या एका मुलाखतीत बोलताना तेजश्री म्हणाली होती, "नाण्याला दोन बाजू असतात. तिशीच्या आत लग्न होऊन जाणं याची एक चांगली बाजू आहे तशीच तिशीच्यानंतर लग्न होऊन जाणं यातूनही फार गोष्टी येतात."
advertisement
3/7
 "तिशीच्या आत हल्ली आपण करिअर घेऊन बसतो. मला वैयक्तिक असं वाटतं की, पूर्वी न्यूक्लिअर फॅमिली अशी संस्था नव्हती. तो काळ जेव्हा आजी आजोबांसकट आपण एक हॅप्पी फॅमिली म्हणून वाढलो. तेव्हाचे संस्कार होते, घरात सगळे असले तरी घराची दारं बंद नसायची, बेड रूम लॉक नसायची सताड उघडी असायची. आजच्या काळात आमची प्रायव्हसी, आमची स्पेस यात आजच्या मुलांचं ते बघायचं राहून गेलंय."

4/7
तेजश्री म्हणाली,
तेजश्री म्हणाली, "एक नातं सांभाळण्यासाठी आपण आपल्या आईला पाहिलं, आजीआजोबांना पाहिलं पण आजच्या मुलांना ते मिळत नाहीये. आपल्याला काही प्रश्न पडले तर त्याची उत्तरं मिळण्यासाठी आपण आई-बाबा संध्याकाळी घरी येण्याची वाट पाहायचो. आजची मुलं लगेच सर्च करतात गूगलवर."
advertisement
5/7
 "तेव्हा एखादी गोष्ट तुटलं तर त्याचे डाग राहिले तरी ती पुन्हा जोडण्याचा आनंद असायचा. आपण ते कसं जोडलं याचं कौतुक असायचं. आजच्या काळात तुमच्याकडे रिप्लेसमेंट आहे कारण ते जोडायचा वेळच नाहीये. ज्या गोष्टी आम्हाला विशीत, पंचवीशीत कळल्या त्या गोष्टी या मुलांना कळण्यासाठी तिशी, पस्तिशी उलटणार आहे. त्या नात्याची कमिटमेन्ट काय आहे, त्या नात्यात काय कॉम्प्रोमाइज करायचं हे कळण्यासाठी कधी कधी पस्तिशीनंतरच लग्न चांगलं आहे."

6/7
तेजश्री पुढे म्हणाली,
तेजश्री पुढे म्हणाली, "काही वेळा असंही वाटतं की, मानवी स्वभावाचा आणि सायकोलॉजिचा विचार केला तर तिशीनंतर तुमच्या आयुष्यात होणारे बदल स्वीकारणं तुम्हाला कठिण जातं. एका नवीन माणसाबरोबर, फॅमिलीबरोबर जाऊन तुम्ही सेटल होता तेव्हा वयाच्या तिशीपर्यंत आपलं शरीराची आणि मनाची अवस्था असते की तिथे आपण गोष्टी पटकन स्वीकारू शकतो. पुढे सोपं होतं."
advertisement
7/7
 "तेच तिशीपर्यंत तुम्ही इतके एकटे राहायला शिकलेले असता तिथे डिपेंडन्सीची गरजच उरली नाहीये. मग अशा वेळी लग्न करायचं आहे तर तिथे ती डिपेंडन्सी असणार आहे का, मला त्या माणसाला उत्तरं द्वावी लागणार आहेत का? असे प्रश्न आहेत. हे इतकं व्यक्तिसापेक्ष झालं आहे की याची युनिव्हर्सल उत्तर नाही असू शकतं. त्यामुळे तिशीच्या आधी लग्न करणं आणि त्या अडजस्टमेंट स्वीकारणं आणि पस्तिशीनंतर एक सुखाचा संसार सुरू आहे."

SL vs ENG : इंग्लंडचा चमत्कारीक विजय, श्रीलंका पाकिस्तान पैकी एक टीम 100 टक्के बाहेर जाणार, दुसऱ्या मॅचनंतर समीकरण बदलणार
इंग्लंडचा चमत्कारीक विजय, श्रीलंका पाकिस्तान पैकी एक टीम 100 टक्के बाहेर जाणार,
  • इंग्लंडच्या विजयाने समीकरण बदललं

  • पाकिस्तान वर्ल्डकप मधून बाहेर होणार

  • यजमान श्रीलंकेचही काही खरं नाही

View All
advertisement