लिंबू :
लिंबूचा वापर करून तुम्ही कपड्यांवर लागेलेले रंगांचे डाग अगदी सहज स्वच्छ करू शकता. यासाठी एका भांड्यात लिंबूचा रस काढून घ्या आणि मग रंग लागलेल्या ठिकाणी हा रस लावा. थोडा वेळा रस लावून कपडे असेच राहुद्यात आणि मग कपडे गरम पाण्यात स्वच्छ धुवून घ्या. अशाप्रकारे तुम्ही कपड्यांवर लागलेले होळीचे हट्टी रंग अगदी सहज काढू शकता.
advertisement
Summer Hacks : उन्हाळ्यात कितीही घाम आला तरी 24 तास शरीरातून सुगंधच येईल, ट्राय करा 6 घरगुती उपाय
दही :
कपड्यांवर लागलेले रंगांचे डाग दूर करण्यासाठी तुम्ही दहीचा वापर करू शकता. रंगाचे डाग लागलेल्या ठिकाणी तुम्ही घट्ट दही लावा आणि ते जवळपास तासभर उन्हात ठेवा. मग काहीवेळाने साबणाने स्वच्छ धुवून टाका. अशाने कपड्यांवर लागलेले रंग निघून जाण्यास मदत होईल.
व्हिनेगर :
कपड्यांवरील डाग दूर करण्यासाठी तुम्ही व्हिनेगरचा देखील वापर करू शकता. कपड्यावर ज्या ठिकाणी रंगांचे डाग पडले आहेत अशा ठिकाणी व्हिनेगर टाकून अर्धातास पाण्यात भिजवून ठेवा. यामुळे कपड्यांवरील डाग दूर होतील आणि रंग पूर्णपणे निघून जाण्यास मदत होईल.
(सदर मजकूर हा इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे आहे. तेव्हा दिलेल्या उपायांची खात्री न्यूज 18 मराठी देत नाही.)
