TRENDING:

Shaving Method : दाढी करण्याची योग्य पद्धत कोणती? अनेक पुरुष करतात ही चूक, तज्ज्ञांनी सांगितली पद्धत

Last Updated:

सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करून डर्मोटॉलॉजिस्ट डॉक्टर अग्नि कुमार बोस यांनी शेविंग कशी करावी याची योग्य पद्धत समजावली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुरुष आणि दाढी हे एक समीकरणच आहे. दाढी वाढली की अनेकजण शेविंग करतात. घरी शेविंग करणे सुद्धा सोपे असते त्यामुळे पैसे आणि वेळ दोन्ही वाचवण्यासाठी बरेच पुरुष घरीच शेविंग करणे पसंत करतात. मात्र काहीवेळा शेविंग केल्यावर गालावर ओरखडे दिसतात. याच कारण म्हणजे चुकीच्या पद्धतीने दाढी करणे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करून डर्मोटॉलॉजिस्ट डॉक्टर अग्नि कुमार बोस यांनी शेविंग कशी करावी याची योग्य पद्धत समजावली आहे.
दाढी करण्याची योग्य पद्धत कोणती? अनेक पुरुष करतात ही चूक, तज्ज्ञांनी सांगितली पद्धत
दाढी करण्याची योग्य पद्धत कोणती? अनेक पुरुष करतात ही चूक, तज्ज्ञांनी सांगितली पद्धत
advertisement

दाढी कशी करावी?

डॉ. अग्नि यांनी सांगितले की, नेहमी शेविंग करताना दाढीच्या केसांच्या वाढीवर लक्ष देणे. केस जर गालापासून तिरप्या दिशेने खालच्या बाजूने वाढत असेल आणि मानेवरील केस वरच्या दिशेने वाढत असेल तर गालाजवळ रेजर वरून खालच्या दिशेने फिरवा आणि मानेवर रेजर खालून वरच्या दिशेने फिरवा. अशा पद्धतीने दाढी केल्यास इनग्रोन हेअर निघून जातील.

advertisement

महिलाही चेहेऱ्यावर शेविंग करू शकतात?

डॉ. अग्नि यांनी सांगितले की, अनेकदा महिलांच्या चेहऱ्यावर विशिष्ठ ठिकाणी हेअर ग्रोथ जास्त येते. मात्र महिलांनी चेहऱ्यावर शेविंग केल्यास येणारे केस हे जाडसर येतात असा काहींचा समज असतो. मात्र डॉक्टरांनी हा गैरसमज असल्याचे म्हंटले आहे. त्यामुळे आवश्यकतेनुसार महिला सुद्धा शेविंग करून अतिरिक्त केस काढून टाकू शकतात.

advertisement

दाढी करण्यापूर्वी कोणती काळजी घ्यावी :

दाढी करण्यापूर्वी चेहरा व्यवस्थित धुवून घ्यावा. चेहरा स्वच्छ असला की शेविंग चांगली होते.

शेविंग करण्यासाठी चांगल्या क्वालिटीचे रेजर वापरा अन्यथा यामुळे त्वचेला अपाय होऊ शकतो.

लो क्वालिटीचे रेजर दाढी करण्यासाठी वापरल्याने केस नीट निघत नाहीत. दाढी करायला जास्त वेळ लागतो, तसेच त्वचेवर डाग पडून इरिटेशन सुद्धा होऊ शकते.

advertisement

Monsoon Hacks : पावसाळ्यात लाकडाचे खिडकी-दरवाजे फुगून जाम झालेत? 7 उपाय वापरा, जाम झालेल्या गोष्टी एका झटक्यात उघडतील

दाढी करताना कधीही ड्राय शेविंग करू नका. यामुळे त्वचा कापली जाण्याचा धोका असतो. तेव्हा दाढी करताना नेहमी शेविंग क्रीम, साबण इत्यादींचा वापर करावा.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी, सोयाबीनच्या दरात मोठी घट, कापसाला काय मिळाला भाव?
सर्व पहा

शेविंग करताना फार जास्त प्रेशर देऊ नका, हलक्या हाताने शेविंग करा. तसेच शेविंग केल्यावर चेहऱ्यावर मॉइश्चरायझर लावणं गरजेचं आहे.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Shaving Method : दाढी करण्याची योग्य पद्धत कोणती? अनेक पुरुष करतात ही चूक, तज्ज्ञांनी सांगितली पद्धत
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल