1.लघवीतील लक्षणांकडे लक्ष द्या
लघवीची वारंवारता वाढणे – दिवसा किंवा रात्री वारंवार लघवीला जावे लागणे हे प्रोस्टेट ग्रंथीच्या सूज किंवा ट्युमरकडे संकेत देऊ शकते.
लघवी सुरू करण्यात अडचण येणे – लघवीला सुरुवात करण्यासाठी ताण द्यावा लागणे किंवा लघवी खूप वेळ लागून सुरू होणे हे गंभीर लक्षण आहे.
लघवीचा प्रवाह कमी होणे किंवा खंडित होणे – सामान्य वेगाने लघवी न होणे, थांबून-थांबून येणे, प्रवाहात अडथळा जाणवणे यामागे प्रोस्टेटचा त्रास असू शकतो.
advertisement
लघवीदरम्यान वेदना किंवा जळजळ – अनेकदा ही समस्या सामान्य संसर्गामुळेही येऊ शकते; पण सातत्याने असे होत असेल तर तपासणी गरजेची आहे.
लघवीत रक्त दिसणे – हे सर्वात गंभीर लक्षणांपैकी एक आहे. रक्तमिश्रित लघवी तातडीने तपासायला हवी.
2.इतर लक्षणेही ओळखा
फक्त लघवीतील बदलच नव्हे तर पाठी, कंबरेत किंवा नितंबात होणारा सततचा त्रास, अचानक वजन कमी होणे, शरीरातील कमजोरी आणि लैंगिक समस्यांमध्ये वाढ हीसुद्धा प्रोस्टेट कॅन्सरची महत्त्वाची लक्षणे ठरू शकतात. वय 50 वर्षांपेक्षा जास्त असणे, कुटुंबातील इतिहास, लठ्ठपणा, चुकीची जीवनशैली, धूम्रपान, मद्यपान आणि जंकफूडचे सेवन हे धोका वाढवणारे घटक मानले जातात.
3.निदान व तपासण्या
जर वर उल्लेखित लक्षणे दिसू लागली, तर तज्ज्ञ डॉक्टरांकडून तातडीने तपासणी करणे गरजेचे आहे. साधारणपणे PSA (Prostate Specific Antigen) टेस्ट, डिजिटल रेक्टल एग्झामिनेशन (DRE), अल्ट्रासाऊंड आणि बायोप्सी अशा तपासण्या करून प्रोस्टेट कॅन्सरची खात्री करता येते.
4.उपचार पद्धती
प्रोस्टेट कॅन्सरपासून बचावासाठी नियमित व्यायाम आणि संतुलित आहार महत्त्वाचा ठरतो. धूम्रपान व मद्यपान टाळल्यास धोका कमी होतो. हिरव्या भाज्या, ताजे फळे आणि अँटीऑक्सिडंटयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करावा. तसेच, वार्षिक आरोग्य तपासणी करणे गरजेचे असून 50 वर्षांनंतर विशेष दक्षता घ्यावी. (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)