TRENDING:

Sleep Pattern : प्रकृतीनुसार ठरवा झोपेचा पॅटर्न, जाणून घ्या युनानी चिकित्सा पद्धतीनुसार कोणत्या व्यक्तीला किती झोप आवश्यक

Last Updated:

झोपेच्या कमतरतेमुळे अशक्तपणा, चिडचीड वाढणं आणि विचार करण्याची क्षमता बिघडू शकते. दुसरीकडे, युनानी तत्वांमधे आवश्यकतेपेक्षा जास्त वेळ जागं राहणं देखील हानिकारक मानलं जाते. उशिरापर्यंत जागं राहणं किंवा सतत काम केल्यानं शरीरात उष्णता आणि कोरडेपणा वाढू शकतो.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : शरीराला किती झोप आवश्यक आहे आणि त्याप्रमाणे झोपेचं गणित जुळत असेल तर तुमची प्रकृती चांगली राहते. झोपेचं आणि जागेपणाचं योग्य संतुलन राखणं याला युनानी औषधांमधे, निरोगी जीवनाच्या मूलभूत तत्त्वांपैकी एक मानलं जातं.
News18
News18
advertisement

झोपेचं संतुलन बिघडलं तर शरीरात अनेक आजार निर्माण होऊ शकतात. युनानी वैद्यकशास्त्रानुसार, झोप ही केवळ विश्रांतीची वेळ नाही, तर शरीराच्या दुरुस्तीसाठी ही सर्वात महत्वाची वेळ आहे. झोपेच्या वेळी, शरीराची आंतरिक शक्ती, ज्याला ग्रीकमधे रुह-ए-हयती म्हणतात, ती संरक्षित राहते आणि शरीराच्या खराब झालेल्या भागांची दुरुस्ती करते.

Thirst : बाहेरचं अन्न खाऊन तहान जास्त लागते ? समजून घेऊया नेमकं काय घडतं ?

advertisement

झोपेच्या काळात, पचन संतुलित होतं, मन शांत होतं आणि शरीर ताजंतवानं होतं. झोपेच्या कमतरतेमुळे अशक्तपणा, चिडचीड वाढणं आणि विचार करण्याची क्षमता बिघडू शकते. दुसरीकडे, युनानी तत्वांमधे आवश्यकतेपेक्षा जास्त वेळ जागं राहणं देखील हानिकारक मानलं जाते. उशिरापर्यंत जागं राहणं किंवा सतत काम केल्यानं शरीरात उष्णता आणि कोरडेपणा वाढू शकतो.

मेंदू, डोळे आणि नसा सर्वात आधी प्रभावित होतात. या व्यक्तींना अनेकदा डोकेदुखी, चिडचिड, अस्वस्थता,  तोंड कोरडं होणं आणि थकवा जाणवतो. हे दीर्घकाळ चालू राहिलं तर शरीरातील ओलावा कमी होऊ लागतो, ज्यामुळे अशक्तपणा आणि अकाली वृद्धत्व येऊ शकतं.

advertisement

Cancer : शरीरात नकळतपणे होतो कर्करोगाचा शिरकाव, वेळीच व्हा सावध

जास्त झोपणं देखील तितकंच हानिकारक -

युनानी वैद्यकशास्त्रानुसार, जास्त झोप हानिकारक असू शकते. जास्त झोपेमुळे शरीरातील बुरुदत म्हणजेच थंडपणा आणि रुतुबत म्हणजेच अति ओलावा वाढतो. यामुळे, शरीराची कार्यक्षमता मंदावते, पचन कमकुवत होतं आणि आळस येतो. जास्त झोपणाऱ्या लोकांमधे लठ्ठपणा, जडपणा, गॅस, खोकला आणि एकाग्रतेचा अभाव  अशी लक्षणं आढळतात.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शिक्षणाची जोड अन् जिद्दीची भरारी,माय-लेकाने सुरु केला व्यवसाय, कमाई तर पाहा
सर्व पहा

झोपेची गरज ही मनःस्थिती आणि वयानुसार ठरवली जाते. चांगलं आरोग्य राखण्यासाठी, व्यक्तीची मनःस्थिती आणि वयानुसार झोपेच्या वेळा ठरवणं गरजेचं असल्याचं युनानी वैद्यकशास्त्रात म्हटलं आहे. मुलांना जास्त झोपेची आवश्यकता असते, तर वृद्धांना कमी. त्याचप्रमाणे, गरम स्वभावाच्या लोकांना संतुलित, हलकी झोप आवश्यक असते, तर थंड स्वभावाच्या लोकांनी जास्त झोपू नये याची काळजी घ्यावी. रात्रीची झोप ही तब्येतीच्या दृष्टीनं सर्वोत्तम मानली जाते, ज्यामुळे सकाळी फ्रेश वाटतं.

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Sleep Pattern : प्रकृतीनुसार ठरवा झोपेचा पॅटर्न, जाणून घ्या युनानी चिकित्सा पद्धतीनुसार कोणत्या व्यक्तीला किती झोप आवश्यक
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल