जाणून घेऊयात कोणते पदार्थ खाल्ल्याने तुमच्या डोळ्यांचं आरोग्य सुधारू शकतं.
गाजर
advertisement
डोळ्यांच्या आरोग्यासाठी गाजर वरदान मानलं जातं. गाजरात बीटा-कॅरोटीन असतं, ज्याचं रूपांतर व्हिटॅमिन ए मध्ये होतं. डोळ्यांचा रेटिना निरोगी ठेवण्यासाठी व्हिटॅमिन ए मदत करतं. गाजराचं नियमित सेवन केल्याने रात्री कमी दिसण्याचा त्रास असल तर तो सुद्धा कमी होतो. गाजर कच्चं किंवा सलाड म्हणूनही खाता येतं. तुम्ही गाजराचा ज्यूसही पिऊ शकता.
अक्रोड आणि अळशीच्या बिया
अक्रोड आणि अंबाडीच्या बियांमध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड अधिक प्रमाणात असतं, जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायद्यांचं आहे. ओमेगा 3 फॅटी ॲसिडमुळे डोळ्यांचा कोरडेपणा कमी होतो. त्यामुळे डोळ्यांचा ओलावा कायम राहिल्यामुळे डोळ्यांच्या पडद्याचं आर्युमान वाढतं. दररोज 4 ते 5 अक्रोड आणि एक चमचा अळशीच्या बिया खाल्ल्यास तुमच्या डोळ्यांचं आरोग्य सुधारेलच मात्र तुमचं वजनही कमी व्हायला मदत होईल.
हिरव्या पालेभाज्या
हिरव्या पालेभाज्या विशेषत: पालकमध्ये ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन नावाचे अँटिऑक्सिडंट्स असतात, जे हानिकारक अतिनील किरणांपासून डोळ्यांचे संरक्षण करण्यास मदत करतात. त्यामुळे पालक सूप, पालक पराठा किंवा पालकाची भाजी खाल्ल्याने तुमची दृष्टीदोष दूर व्हायला मदत होते.
हे सुद्धा वाचा : Eyes Dryness in Winter: हिवाळ्यात डोळे कोरडे पडत आहेत? डोळ्यातून पाणी येतंय? 'अशी' घ्या डोळ्यांची काळजी
'व्हिटॅमिन सी' युक्त फळं
संत्री, लिंबू आणि अनेक लिंबूवर्गीय फळांमध्ये व्हिटॅमिन सी आढळतं, जे डोळ्यांच्या पेशींना होणारं संभाव्य नुकसान टाळतं. रोज एक ग्लास संत्र्याचा रस प्यायल्याने दृष्टी सुधारायला मदत होते. याशिवाय व्हिटॅमिन सी मुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्यामुळे शरीराचं एकूणच आरोग्य सुधारल्याने डोळ्यांच्या आरोग्यातही सुधारणा होऊ शकते.
अंड्याचा पिवळा बलक
अंड्यातील पिवळ्या बलकात ल्युटीन, झेक्सॅन्थिन आणि व्हिटॅमिन ई असते, जे डोळ्यांच्या स्नायूंना बळकट करण्यास मदत करतात. उकडलेलं अंड खाल्ल्याने चष्म्याचा नंबर कमी व्हायला मदत होते. याशिवाय अंड्यात असलेले प्रोटिन्स शरीर तंदुरूस्त ठेवण्यात मदत करतात.