TRENDING:

Instant Sweet Recipe : फक्त 10 मिनिटांत बनेल झटपट कलाकंद! 'ही' टेस्टी आणि इन्स्टंट रेसिपी एकदा नक्की ट्राय करा..

Last Updated:

Instant Sweet kalakand Recipe : आज आपण बनवणार आहोत, इन्स्टंट टेस्टी कलाकंद. हे कलाकंद फक्त घटकांपासून बनते. हे अतिशय मऊ आणि झटपट कलाकंद. तर होळीच्या निमित्ताने तुम्हीही एखादी मिठाई बनवू इच्छित असाल तर हे कलाकांत नक्की ट्राय करा.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
Choose
News18 on Google
advertisement
मुंबई : आपल्याकडे कोणत्याही सणाला मिठाई बनवली जाते. मात्र आपल्या भारतीय मिठाया तसा बनवायला खूप खूप वेळ घेतात. त्यांची चवही तितकची जबरदस्त असते. मात्र हल्ली सोशल मीडियावर अनेक अशा रेसिपी मिळतात, ज्या कमी वेळेत तयार होतात आणि अत्यंत टेस्टी असतात. आज आम्ही युमहाला सहाच एका रेसिपीबद्दल सांगत आहोत.
झटपट कलाकंद रेसिपी मराठीत
झटपट कलाकंद रेसिपी मराठीत
advertisement

आज आपण बनवणार आहोत, इन्स्टंट टेस्टी कलाकंद. हे कलाकंद फक्त घटकांपासून बनते. हे अतिशय मऊ आणि झटपट कलाकंद. तर होळीच्या निमित्ताने तुम्हीही एखादी मिठाई बनवू इच्छित असाल तर हे कलाकांत नक्की ट्राय करा.

इन्स्टंट कलाकंद बनवण्यासाठी लागणारे साहित्य

- 400 ग्रॅम मलई पनीर

- 1/2 चमचा तूप/क्लिअर बटर

- 400 ग्रॅम गोड केलेले कंडेन्स्ड मिल्क

advertisement

- 1/2 चमचा वेलची पावडर

- पिस्ता

- वाळलेल्या गुलाबाच्या पाकळ्या

इन्स्टंट कलाकंद बनवण्याची कृती..

- सर्वात आधी पनीर हाताने फोडून त्याचा भुगा करा. पण ते किसून घेऊ नका. कारण असेल केल्यास कलाकंडला हवे तसे टेक्श्चर येणार नाही.

- आता कढईत तूप गरम करा आणि नंतर पनीर घाला. पनीर थोडे मऊ होईपर्यंत काही मिनिटे शिजवा. पण जास्त शिजवू नका.

advertisement

- नंतर यामध्ये कंडेन्स्ड मिल्क घाला आणि चांगले मिसळा.

- 4-5 मिनिटे किंवा पनीर कंडेन्स्ड मिल्क शोषून घेईपर्यंत हे ढवळा.

- यानंतर याचे टेक्शचर थोडे घट्ट होईल, तेव्हा गॅस बंद करा. जास्त शिजवू नका, नाहीतर कलाकंद कडक होईल.

- शेवटी वेलची पावडर घाला आणि चांगले मिसळा.

- आता कलाकंद एका ग्रीस केलेल्या साच्यात घाला आणि व्यवस्थित पसरवा.

- आता यावर काही चिरलेले पिस्ता आणि वाळलेल्या गुलाबाच्या पाकळ्यां घालून सजवा.

advertisement

- हे कलाकंद रूम टेम्परेचरवर 30 मिनिटांपर्यंत किंवा घट्ट होईपर्यंत सेट होऊ द्या.

- कलाकंद सेट झाल्यानंतर त्याचे चौकोनी आकारात तुकडे करा.

- फ्रिजमध्ये हे कलाकंद एका आठवड्यापर्यंत आणि रूम टेम्पोरेचरवर 3 दिवसांपर्यंत टिकू शकते.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
रमजानमध्ये दिली जाते जकात, काय आहे या मागील प्रथा आणि महत्त्व? Video
सर्व पहा

Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Instant Sweet Recipe : फक्त 10 मिनिटांत बनेल झटपट कलाकंद! 'ही' टेस्टी आणि इन्स्टंट रेसिपी एकदा नक्की ट्राय करा..
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल