TRENDING:

Katachi Amati : होळीला बनवा झणझणीत तर्रीवाली कटाची आमटी; पुरणपोळीच काय, भाताचीही वाढवेल चव!

Last Updated:

Katachi Amati Recipe : आज आम्ही तुम्हाला झणझणीत तर्रीवाली मराठवाडी स्पेशल कटाची आमटी कशी बनवायची याची रेसिपी सांगत आहोत. दिलेल्या रेसिपीप्रमाणे तुम्ही कटाची आमटी बनवाल तर ती अगदी परफेक्ट आणि चवदार बनेल.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : होळीच्या दिवशी पुरणपोळी बनवण्याची महाराष्ट्रात पद्धत आहे. या दिवशी आवर्जून लोक पुरणाची पोळी बनवतात आणि खातात. या दिवशी तिचा मन असतो असे म्हणले जाते. पण ताटात पुराणपोळीसोबत आणखी एक पदार्थ असतो, ज्याच्याशिवाय जेवणाला चव येत नाही. ते म्हणजे कटाची आमटी. पुरणपोळी असो की भात दोन्हींसाठी पूरक अशी कटाची आमटी ताटात असल्याशिवाय जेवणाला मजा येत नाही.
झणझणीत तर्रीवाली मराठवाडी स्पेशल कटाची आमटी रेसिपी
झणझणीत तर्रीवाली मराठवाडी स्पेशल कटाची आमटी रेसिपी
advertisement

आज आम्ही तुम्हाला झणझणीत तर्रीवाली मराठवाडी स्पेशल कटाची आमटी कशी बनवायची याची रेसिपी सांगत आहोत. दिलेल्या रेसिपीप्रमाणे तुम्ही कटाची आमटी बनवाल तर ती अगदी परफेक्ट आणि चवदार बनेल. ही रेसिपी ashwinisrecipe या अकाऊंटवर दिली आहे. चला तर मग पाहूया झणझणीत तर्रीवाली कटाची आमटी कशी बनवायची.

कटाची आमटी बनवण्यासाठी लागणारे साहित्य..

advertisement

- चणाडाळ

- कांदा

- खोबर

- आलं-लसूण पेस्ट

- कढीपत्ता

- कोथिंबीर

- तेल

- काळा मसाला

- मीठ

अशी बनवा कटाची आमटी..

- सर्वात आधी तुम्ही पुराणासाठी जी डाळ शिजवली आहे त्याचे पाणी आणि त्यातही थोडीशी डाळ काढून ठेवा.

- या डाळीच्या पाण्याला येळवणी देखील म्हणतात. याच येळवणीपासूनच कटाची आमटी बनवली जाते.

advertisement

- आता कांदा आणि खोबरं चिरून ते तेलामध्ये छान भाजून घ्या. नंतर ते मिक्सरमध्ये थोडं पाणी घालून बारीक वाटून घ्या.

- यानंतर आपण आमटीसाठी बाजूला ठेवलेली डाळ हलकी बारीक करून येळवणीमध्ये मिक्स करून घ्या.

- आता आपल्याला फोडणी द्यायची आहे त्यासाठी एका कढईमधे तेल टाका.

- त्यानंतर या तेलामध्ये आलं लसणाची पेस्ट घाला आणि परतून घ्या.

advertisement

- नंतर कढीपत्ता घालाल आणि परत परतून घेणं गॅसची फ्लेम कमी करा.

- गॅस कमी केल्यानंतर यामध्ये काळा मसाला घाला. तुम्ही घरगुती किंवा की बाहेरचा कोणताही मसाला वापरू शकता.

- यानंतर थोडी कोथिंबीर घाला आणि परतून घ्या.

- आता मिक्सरमध्ये बारीक केलेलं कांदा खोबऱ्याचं वाटण घालून तेल सुटेपर्यंत परतून घ्या.

advertisement

- आता यामध्ये येळवणी घालायचं आणि त्यानंतर गरजेनुसार पाणी घालायचं.

- यानंतर चवीपुरतं मीठ टाका आणि वरून भरपूर कोथिंबीर घाला.

- आता याला मोठ्या फ्लेमवर एक उकळी येऊ द्या. उकळी आली की, गॅस कमी करा

- यानंतर कमी फ्लेमवर आणखी 10 मिनिटे ही आमटी शिजवून घ्या.

तर अशाप्रकारे तुमची झणझणीत तर्रीवाली मराठवाडी स्पेशल कटाची आमटी तयार आहे. यंदाच्या होळीला ही रेसिपी नक्की ट्राय करा. पुरणपोळीसोबत ही आमटी अगदी मस्त आणि स्वादिष्ट लागते. एकदा नक्की ट्राय करा.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कोकणातील सर्वात मोठा शिमगा,रायगडमध्ये पेटते 50 फुटांची भव्य होळी,काय आहे परंपरा?
सर्व पहा

Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Katachi Amati : होळीला बनवा झणझणीत तर्रीवाली कटाची आमटी; पुरणपोळीच काय, भाताचीही वाढवेल चव!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल