अशा परिस्थितीत आपण पापड तेलात न तळता कसे खाऊ शकतो हे जाणून घेऊया. प्रसिद्ध मास्टर शेफ पंकज भदौरिया यांनी याबाबत एक उत्तम युक्ती शेअर केली आहे. शेफ पंकजने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली असून तेलाशिवाय पापड तयार करण्याची एक उत्तम युक्ती त्यांनी सुचवली आहे. चला त्या युक्तीबद्दल जाणून घेऊया.
advertisement
पापड आणि चिप्स तेलाशिवाय कसे तळायचे?
शेफ पंकज भदौरिया यांनी पापड तळण्याची ही युक्ती अतिशय सोपी आणि मनोरंजक आहे. यासाठी पापड आणि चिप्स व्यतिरिक्त तुमच्या घरात मीठ असणे आवश्यक आहे. होय, मीठ. कारण या युक्तीमध्ये तुम्हाला पापड तेलात नाही तर मीठात भाजायचे आहेत. तेलात पापड डीप फ्राय करण्याची गरज नाही. शेफ पंकजच्या या व्हिडिओला एक लाख 35 हजार लाईक्स मिळाले आहेत.
शेफ पंकजने सांगितलेल्या युक्तीनुसार, सर्व प्रथम गॅसवर तवा ठेवा. त्यात भरपूर मीठ घाला. मिठचांगले गरम झाल्यावर गॅस मंद करा आणि त्यात एक पापड घाला आणि त्यावर मीठ टाकत टाकत ते व्यवस्थित भाजून घ्या. त्याचप्रमाणे चिप्स आणि इतर गोष्टी मीठात भाजू शकतात. शेफच्या या ट्रिकवर लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या आहेत. हा व्हिडिओ अनेक वेळा शेअर करण्यात आला आहे, लाखो लोकांनी तो पाहिला आहे.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणतीही कृती करण्यापूर्वी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.)