K Pop, BTS हे शब्द आता सर्रास ऐकू येतायत. कोरियन ब्युटी टिप्स, स्किन केअरचीही चर्चा आहे. भारतात दक्षिण कोरियाची संस्कृती, ज्याला के-वेव्ह किंवा हल्ल्यू म्हणून ओळखलं जातं, ती आता टीव्ही किंवा मोबाईल स्क्रीनपुरती मर्यादित राहिलेली नाही. ती भारतीय तरुणांच्या आवडी, विचार आणि जीवनशैलीवर ही प्रभाव पाडत आहे.
भारतातले किशोरवयीन कोरियन शो किंवा के-पॉपचा चाहते होतायत. हे प्रमाण का वाढतंय, त्याची लोकप्रियता आणि त्याचे परिणामही दिसून येतायत. के-वेव्ह सॉफ्ट पॉवर डिप्लोमसीच्या माध्यमातून भारतात अब्जावधी डॉलर्सचा व्यवसाय म्हणून पसरत चालली आहे.
advertisement
Fatty Liver : फॅटी लिव्हरचं प्रमाण का वाढतंय ? आजपासूनच बदला चुकीच्या सवयी
भारतात के-वेव्ह लॉकडाऊन दरम्यान सुरू झाली, नेटफ्लिक्स आणि यूट्यूब सारख्या ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे ती वेगानं पसरली. सर्वजण घरातच बंदिस्त असल्यानं, या काळात ओटीटी प्लॅटफॉर्म मनोरंजनाचा एक उत्तम स्रोत बनले. या काळात कोरियन नाटके आणि चित्रपटांच्या प्रेक्षकांमध्ये ३७०% वाढ झाली आणि तेव्हापासून हा ट्रेंड वाढतच गेला आहे.
भारतात कोरियन कंटेंट पाहणाऱ्यांची संख्या दरवर्षी 30% पेक्षा जास्त वाढली आहे. स्क्विड गेम आणि माय गर्लफ्रेंड इज अॅन एलियन सारख्या शोनं भारतीय प्रेक्षकांना गुंगवलं. शिवाय, के-पॉप देखील तरुणांमधे लोकप्रिय आहे. BTS बँडचे चाहते सर्वदूर आहेत.
के-वेव्ह आता चित्रपट आणि नाटकांच्या पलीकडे विस्तारली आहे. अन्न, सौंदर्यप्रसाधनं आणि शिक्षण क्षेत्रात त्याचा प्रभाव दिसून येतोय. भारतातील मोठी तरुण लोकसंख्या कोरियन जीवनशैली वेगानं स्वीकारतायत.
के-ब्युटी आणि के-फूडची वाढती मागणी - कोरियन संस्कृतीनं भारतीय बाजारपेठेत के-ब्युटी आणि के-फूडसाठी अब्जावधी डॉलर्सची बाजारपेठ निर्माण केली आहे. ग्लास स्किन ट्रेंडमुळे भारतीयांमधे कोरियन स्किनकेअर उत्पादनं आणि मेकअपची मागणी दरवर्षी झपाट्यानं वाढते आहे. तरुणांमध्ये कोरियन नूडल्सची मागणीही झपाट्यानं वाढत आहे.
के-वेव्हचा भाषा शिकण्याच्या सवयींवरही परिणाम होत आहे. अलीकडील ड्युओलिंगोच्या अहवालानुसार, कोरियन ही भारतातील पाचव्या क्रमांकाची सर्वात जास्त शिकली जाणारी परदेशी भाषा बनली आहे. शैक्षणिक संस्थांमधेही त्याची मागणी वाढली आहे. दिल्ली विद्यापीठ आणि जेएनयूसारख्या प्रमुख विद्यापीठांमधे कोरियन भाषा अभ्यासक्रमांना मोठी मागणी दिसून येत आहे.
Obesity : लठ्ठपणामुळे वाढतो गंभीर आजारांचा धोका, जाणून घ्या कारणं आणि उपाय
के-वेव्ह हा एक चर्चेचा विषय असला तरी, तो चिंतेचा विषयही बनत आहे. कोरियन कंटेंट आणि गेम्सचं व्यसन तरुणांना त्यांच्या कुटुंबांपासून भावनिकदृष्ट्या वेगळं करताना दिसतंय. अनेक कार्यक्रमांमध्ये दाखवलेलं जीवन, सुंदर पात्रं आणि भावनिक कथा यांचा तरुणांवर खोलवर परिणाम होतोय.
किशोरवयीन मुलं त्यांच्या वास्तविक जीवनाची तुलना पडद्यावर दिसणाऱ्या जगाशी करू लागतात तेव्हा त्यांच्यात न्यूनगंड, खोट्या अपेक्षा आणि आत्म-असमाधानाची भावना निर्माण होऊ शकते. कोरियन संस्कृतीत रस असणं वाईट नाही, पण ते व्यसन बनलं तर ते किती धोकादायक ठरू शकतं हे गाझियाबादच्या घटनेवरुन समजणं गरजेचं आहे.
