TRENDING:

कधी विचार केलाय ओठांना का येत नाही घाम? यामागे आहे ही कारणे?

Last Updated:

शरीराला घाम येणं ही खरं तर सामान्य बाब आहे. उन्हाळ्यात किंवा जास्त शारीरिक श्रम केल्यावर आपल्याला घाम येतो. काही गंभीर आजारातदेखील शरीराला घाम फुटतो. तसंच एखाद्या आजाराचं प्रमुख लक्षण म्हणूनदेखील याकडे पाहिले जाते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली:  शरीराला घाम येणं ही खरं तर सामान्य बाब आहे. उन्हाळ्यात किंवा जास्त शारीरिक श्रम केल्यावर आपल्याला घाम येतो. काही गंभीर आजारातदेखील शरीराला घाम फुटतो. तसंच एखाद्या आजाराचं प्रमुख लक्षण म्हणूनदेखील याकडे पाहिले जाते. बऱ्याचदा मानसिक भीतीमुळेदेखील घाम फुटतो. रात्री झोपेत एखादं वाईट स्वप्न पाहिलं तरी घाम सुटतो. श्रम, धावपळ किंवा भीतीमुळे घाम येणं नैसर्गिक असतं; पण शरीरात असा एक अवयव असतो, ज्या ठिकाणी कधीही घाम येत नाही. अर्थात त्यामागं शास्त्रीय कारणं आहेत. हा अवयव कोणता आणि तिथं घाम का येत नाही ते सविस्तर जाणून घेऊ या.
'या' कारणांमुळे ओठांना अजिबात येत नाही घाम
'या' कारणांमुळे ओठांना अजिबात येत नाही घाम
advertisement

मी घाम गाळून पैसा कमावला आहे, असं तुम्ही अनेकांकडून ऐकलं असेल. याचा अर्थ त्या व्यक्तीनं मेहनतीनं घाम गाळून पैसा कमावला आहे असा होतो. घाम येणं ही सामान्य गोष्ट आहे. उन्हाळ्यात थोडे परिश्रम केले तरी लगेच घाम येतो. शरीर थंड ठेवण्यासाठी घाम येणं गरजेचं असतं. ही नैसर्गिक प्रक्रिया आहे; पण शरीरात असा एक अवयव असतो, ज्या ठिकाणी अजिबात घाम येत नाही. हा अवयव म्हणजे ओठ होय. ओठांना कधीच घाम येत नाही.

advertisement

बॉडी बनवण्याच्या नादात करु नका या चुका, जाणून घ्या जीम करण्याचं योग्य वय काय?

शरीरात अॅक्सोक्राइन नावाच्या ग्रंथी घामाची निर्मिती करतात. त्या संपूर्ण शरीरात पसरलेल्या असतात. या ग्रंथी सुडोरिपेरस ग्लँड्स नावानंदेखील ओळखल्या जातात. सुडोरिपेरस ग्लँड्स हे नाव 'सुडोर' या लॅटिन भाषेतल्या शब्दावरून पडलं आहे. याचा अर्थ घाम असा आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
APMC Market: कृषी मार्केटमध्ये उलटफेर, कांदा, केळीनं वाढवलं टेन्शन, लिंबू अन् द्राक्षांना किती मिळाला भाव?
सर्व पहा

तुम्ही जर बारकाईनं पाहिलं असेल तर तुमच्या लक्षात येईल की आपल्या ओठांना कधीच घाम येत नाही. ओठांवर कोणत्याही प्रकारचा संरक्षक थर नसतो. ओठांवर घाम न येण्याचं सर्वांत महत्त्वाचं कारण म्हणजे शरीरातल्या या ठिकाणी स्वेट ग्लँड्स अर्थात घामाच्या ग्रंथी नसतात. याचाच अर्थ शरीराला घाम येण्यासाठी कारणीभूत असलेल्या ग्रंथी ओठात नसतात. त्यामुळे ओठ लवकर सुकतात. बऱ्याचदा उन्हाळ्यात किंवा कडाक्याच्या थंडीत ओठ कोरडे पडण्याची समस्या जाणवते. घाम निर्माण करणाऱ्या ग्रंथी ओठात नसल्याने ते कोरडे पडतात. हे या अवयवाचं वेगळेपण म्हणावं लागेल.

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
कधी विचार केलाय ओठांना का येत नाही घाम? यामागे आहे ही कारणे?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल