डायबेटीस कोणत्याही वयात होऊ शकतो. लहान मुलं, किशोरवयीन मुलं आणि तरुणांना प्रामुख्याने टाइप 1 डायबेटीस होतो. वयाची 40 वर्षं ओलांडलेल्यांना टाइप 2 डायबेटीस होतो. हा आजार किडनी आणि हृदयासाठी प्रमुख धोका आहे. त्यामुळे तुम्हाला जर डायबेटीससंबंधी काही लक्षणं जाणवत असतील तर तात्काळ डॉक्टरांकडे गेलं पाहिजे. काही महत्त्वाच्या लक्षणांबद्दल माहिती घेऊ या.
advertisement
काय आहेत लक्षणे?
तोंडाला कोरड पडणे : सकाळच्या वेळी तोंडाला कोरड पडणं हे डायबेटीसच्या सामान्य लक्षणांपैकी एक आहे. सकाळी उठल्यानंतर वारंवार तोंडाला कोरड पडत असेल किंवा जास्त तहान लागत असेल तर रक्तातल्या साखरेचं प्रमाण वाढलेलं असण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत ताबडतोब डॉक्टरांकडून तपासणी करून घेणं गरजेचं आहे.
दृष्टी अंधूक होणं : सकाळी झोपेतून उठल्यानंतर जर काही काळ तुम्हाला अंधूक दिसत असेल तर हे डायबेटीसचं लक्षणं आहे. डायबेटीसमुळे दृष्टी अंधूक होऊ शकते. रक्तातली साखरेची पातळी वाढल्यामुळे डोळ्यांच्या लेन्स मोठ्या होतात, असं डॉक्टरांचं मत आहे.
थकवा येणं : थकवा येणं हे डायबेटीसचं सामान्य लक्षण आहे. इन्सुलिनची कमी निर्मिती आणि रक्तातल्या साखरेचं प्रमाण वाढल्याने शरीराला सुस्ती येते. थकवा ही एक सामान्य समस्या आहे. जास्त काम आणि तणावामुळेदेखील थकवा जाणवतो. त्यामुळे अनेक जण ती समस्या फारशी गांभीर्याने घेत नाहीत.
हात थरथरणं : जर रक्तातल्या साखरेची पातळी प्रति लिटर चार मिलीमोल्स (mmol) पेक्षा कमी असेल तर भूक लागणं, हातांची थरथर होणं आणि घाम येणं अशा समस्या जाणवतात. ही डायबेटीसची सुरुवातीची लक्षणं आहेत. स्थिती जास्त गंभीर झाल्यास लक्ष केंद्रित करण्यात अडचणी येऊ शकतात.
सध्याच्या धकाधकीच्या लाइफस्टाइलमुळे आपण आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. काही जण कामामध्ये इतके गुरफटले जातात की आपल्याला एखादा आजार झाला आहे, हेसुद्धा त्यांच्या लवकर लक्षात येत नाही. डायबेटीस हा अशाच आजारांपैकी एक आहे. हा आजार समूळ नष्ट करणाऱ्या उपचार पद्धतीचा अद्याप शोध लागलेला नाही. जर एखाद्याला डायबेटीस झाला तर तो आयुष्यभर पिच्छा सोडत नाही. उत्तम आहार आणि आरोग्यदायी लाइफस्टाइलच्या माध्यमातून त्यावर नियंत्रण ठेवता येतं.