आज आम्ही तुम्हाला अशाच एका फेमस आणि पारंपरिक पदार्थाविषयी सांगणार आहोत. ती आहे मराठवाड्यातील फेमस आणि पारंपारिक पोंगळीची आमटी. तुम्हाला याला आमटीऐवजी भाजीदेखील म्हणू शकता. आज आपण याची सोपी रेसिपी पाहणार आहोत. ही रेसिपी surekharecipe या अकाऊंटवर शेअर केली गेली आहे. चला पाहूया पोंगळीची आमटी बनवण्याची पद्धत.
पोंगळीची आमटी बनवण्यासाठी लागणारे साहित्य..
advertisement
- कांदा
- खोबरं
- कोथिंबीर
- कढीपत्ता
- बेसन
- लाल तिखट
- हळद
- गरम मसाला
- सब्जी मसाला
- तेल
- आलं लसूण
पोंगळीची आमटी बनवण्याची कृती..
- सर्वात आधी 2 कांदे आणि एक खोबऱ्याची वाटी थेट गॅसच्या फ्लेमवर ठेऊन भाजून घ्या.
- त्यानंतर एका ताटात बेसन पीठ घ्या आणि त्यात लाल तिखट, हळद, मीठ आणि हळूहळू पाणी घालून कणिक मळून घ्या.
- नंतर त्या कणकेला तेल लावून ती बाजूला ठेवा.
- आता भाजलेली खोबऱ्याची वाटी घ्या आणि तिचे बारीक काप करा.
- आता एक मिक्सरच्या भांड्यात भाजलेलं खोबरं, कांदा, कोथिंबीर, आलं आणि लसूण टाकून बारीक पेस्ट बनवून घ्या.
- यातली जवळपास एक चमचा पेस्ट काढून ठेवा आणि उरलेल्या पेस्टमध्ये पाणी टाकून ती पातळ आणि आणखी बारीक करा.
- त्यानंतर थोडंसं आलं, लसूण आणि न भाजलेलं खोबरं घ्या आणि ते खलबत्त्यामध्ये कुटून घ्या.
- आता गॅसवर एखादी कढई किंवा पातेलं ठेवा आणि त्यामध्ये तेल टाका.
- तेल गरम झाल्यावर त्यामध्ये कढीपत्ता आणि कुटलेला मसाला टाका. चांगले परतून घ्या.
- त्यानंतर तुपामध्ये लाल तिखट, हळद, गरम मसाला आणि कोणताही सब्जी मसाला टाका.
- यानंतर आपण मिक्सरमध्ये बारीक केलेली पातळ पेस्ट घाला. यानंतर मीठ घाला आणि तेल सुटेपर्यंत झाकून शिजवा.
- नंतर पाणी घालून भाजीची कन्सिस्टन्सी अड्जस्ट करा.
- आता तयार केली बेसनाची कणिक घ्या. तिचे गोळे बनवून चपातीप्रमाणे लाटून घ्या.
- आता लाटलेल्या बेसनाच्या पोळीवर आपण बाजूला ठेवलेला मसाला लावा. वरून थोडं खोबरं आणि काथिंबीर पेरा.
- आता याचे सुरीने चार सरळ भाग करा आणि त्याचे रोल म्हणजेच पुंगळ्या बनवून घ्या.
- तयार रोल भाजीमध्ये टाका आणि व्यवस्थित शिजवून घ्या.
- शेवटी भाजीमध्ये वरून भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घाला.
अशाप्रकारे तुमची पारंपरिक आणि स्पेशल पुंगळीची आमटी किंवा भाजी तयार आहे. ही भाजी तुमच्या घरातील सदस्यांना नक्की वाढेल. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही तिखटाचे प्रमाण वाढवून ही भाजी आणखी झणझणीत बनवू शकता.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
