सीनियर डाइटिशियन कामिनी सिन्हा याने न्यूज १८ शी बोलताना सांगितलं की पावसाळ्याच्या दिवसात शरीराचं मेटाबॉलिज्म स्लो होत आणि इम्यून सिस्टमवर याचा प्रभाव पडतो. अशातच व्हायरल, बॅक्टेरियल आणि फंगल इंफेक्शन पसरण्याचा धोका वाढतो. या वातावरणात सर्दी, खोकला, घश्यात इंफेक्शन इत्यादी आजार होतात. यापासून वाचवण्यासाठी स्वच्छतेवर विशेष लक्ष द्यायला हवे. तसेच उघड्यावरील बाहेरच अन्न खाणे टाळून जास्तीत जास्त घरचा सकस पौष्टिक आहार खावा.
advertisement
पावसाळ्यात लोकांनी स्ट्रीट फूड खाणे टाळावे, असा सल्ला तज्ज्ञ डॉकटर देतात. स्ट्रीट फूडमुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. या ऋतूमध्ये लोकांना पोटाचे इंफेक्शन, लूज मोशन, गॅस्ट्राइटिसची समस्या जाणवते. तसेच दूषित पाणी प्यायल्यामुळे मलेरिया सारख्या गंभीर समस्या होऊ शकतात. मात्र, आहारात काही बदल केल्यास या समस्यांपासूनही आराम मिळू शकतो. या गोष्टींचे सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते, ज्यामुळे रोगांशी लढण्याची क्षमता वाढते.
Mosquitoes : पावसाळ्यात घरात खूप डास येतात? गॅलरीत लावा ही 5 झाड, डास आसपासही फिरकणार नाही
पावसाळ्यात या 5 गोष्टींचे सेवन करणे फायदेशीर :
पावसाळ्यात लोकांनी आपल्या आहारात आल्याचा समावेश केला पाहिजे. आल्याचा घशावर गरम प्रभाव पडतो, ज्यामुळे खोकला, खवखव इत्यादींपासून आराम मिळतो. आलं घश्याची सूज कमी करते. आल्यात नॅचरल अँटीबॅक्टीरियल गुण असतात. जे शरीराला इंफेक्शन पासून रोखण्यासाठी मदत करतात आणि रोगप्रतिकारकशक्ती मजबूत करतात.
तज्ज्ञांच्या मते पावसाळ्याच्या दिवसात लसूणचे सेवन करायला हवे. लसणाच्या सेवनाने अँटी व्हायरल अँटी बॅक्टेरियल गुण आढळतात. जे शरीराला इंफेक्शनपासून वाचवण्यासाठी उपयोगी ठरतात. लसूण हा गरम पदार्थ आहे. यामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढते आणि इंफेक्शन सुद्धा दूर होते. लसूण तुम्ही रिकाम्या पोटी चावून खाऊ शकता. तसेच भाजीत सुद्धा टाकू शकता.
लिंबू हा व्हिटॅमिन सी चा उत्तम स्त्रोत आहे. त्याच्या सेवनाने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होऊ शकते. तेव्हा पावसाळ्याच्या दिवसात तुम्ही लिंबू पाणी पिऊ शकता किंवा सॅलेड, भाज्या इत्यादींवर लिंबू पिळून त्याच सेवन करू शकतात. लिंबू तुमच्या शरीराला संसर्गापासून लवकर बरे होण्यास मदत करू शकते.
Hair Oil : केसांना मजबूत बनवण्यासाठी हे 4 हेअर ऑईल ठरतात बेस्ट, हेअरफॉल होईल कमी
पावसाळ्याच्या दिवसात व्यक्तीला सर्दी, ताप किंवा घसा दुखणे असा त्रास होत असेल तर त्याने भाज्यांचे सूप तयार करून दिवसातून एक ते दोनदा प्यावे. टोमॅटो सूपमुळे घशाला खूप आराम मिळतो आणि शरीर मजबूत होते. भाज्यांमध्ये आढळणारे पोषक तत्व तुमच्या शरीरातील संसर्ग दूर करण्यासाठी उपयुक्त ठरतील.
पावसाळी ऋतूमध्ये 3 तासांपेक्षा जास्त काळ ठेवलेले अन्न खाणे टाळा तसेच नेहमी अन्न गरम केल्यानंतरच खा. पावसाळ्यात गरम पदार्थ खावेत आणि थंड पदार्थ टाळावेत. यामुळे तुमच्या शरीराला खूप फायदा होतो आणि सर्दी आणि खोकल्यापासून आराम मिळतो.
