जेवण झाल्यावर चुकूनही करू नयेत ही 4 कामे
झोपणे
जेवण झाल्यावर लगेच झोपणे किंवा झोपून आराम करणे ही सर्वात मोठी चूक आहे. यामुळे पचनक्रिया मंदावते, अन्न व्यवस्थित पचत नाही आणि गॅस, अपचन तसेच छातीत जळजळ होण्याची समस्या होऊ शकते.
पाणी पिणे
जेवण झाल्यावर लगेच जास्त पाणी पिणे टाळा. यामुळे पचनशक्तीवर ताण येतो, कारण पाणी पोटातील पाचक रसांना पातळ करते. जेवण झाल्यावर लगेच पाणी पिण्याऐवजी, जेवण झाल्यावर अर्ध्या तासाने पाणी पिणे योग्य आहे.
advertisement
चहा किंवा कॉफी पिणे
अनेक लोकांना जेवणानंतर लगेच चहा किंवा कॉफी पिण्याची सवय असते. पण, चहा-कॉफीमध्ये टॅनिन आणि कॅफिन असतात, जे शरीराला जेवणातील लोह आणि इतर पोषक तत्वे शोषून घेण्यापासून रोखतात. त्यामुळे ही सवय आरोग्यासाठी चांगली नाही.
लगेच फिरायला जाऊ नका
काही लोक पचनक्रिया सुधारण्यासाठी जेवण झाल्यावर लगेच फिरायला जातात. पण, जेवण झाल्यावर लगेच चालल्याने पचनक्रिया मंदावते. जेवण झाल्यावर 10-15 मिनिटाने चालणे फायदेशीर असते, लगेचच नाही.
जेवण झाल्यावर काय करावे?
थोडं चालणे
जेवण झाल्यावर 10-15 मिनिटांनी थोडं चालणे फायदेशीर आहे. यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि पचनक्रिया चांगली होते.
वज्रासनात बसा
जेवण झाल्यावर 5 ते 10 मिनिटे वज्रासनात बसल्यास पचनक्रिया वेगवान होते. हे आसन पोटाच्या भागातील रक्तप्रवाह सुधारते. जेवण झाल्यावर या चुकीच्या सवयी टाळल्यास तुम्ही पोटाच्या अनेक समस्यांपासून दूर राहू शकता आणि तुमच्या आरोग्याला निरोगी ठेवू शकता. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)