तुम्ही सोशल मीडियावर देखील यासंबंधीत लोकांना बोलताना ऐकलं असेल, पण याची नक्की गरज काय किंवा हे का गरजेचं असतं? याबद्दल फार कमी लोक बोलतात.
पुरुषांच्या लैंगिक आरोग्यावर अननसाचे सकारात्मक परिणाम होऊ शकतात, हे फार कमी लोकांना माहीत असतं. अननसामध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन C आणि अँटीऑक्सिडंट्स असतात.
हे अँटीऑक्सिडंट्स शरीरात होणाऱ्या ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसला कमी करतात. हा तणाव स्पर्मच्या डीएनएवर वाईट परिणाम करतो आणि स्पर्म क्वालिटी खराब होण्यामागे कारणीभूत ठरतो. अननस खाल्ल्यास ही क्वालिटी सुधारते.
advertisement
अननसामध्ये काही विशिष्ट एंझाइम्स असतात जे सेलुलर फंक्शन सुधारतात. याचा थेट फायदा शरीरातील सेल्सच्या कार्यक्षमतेला होतो, ज्यामुळे शरीराची वाढ, हालचाल आणि विशेषतः फर्टिलिटी सुधारते.
अननस हे बीटा-कॅरोटीन आणि फ्लाव्होनॉइड्ससारख्या अँटीऑक्सिडंट्सचा चांगला स्रोत आहे. हे स्पर्मला फ्री रॅडिकल्सपासून होणाऱ्या नुकसानीपासून वाचवतात. त्यामुळे स्पर्मची आकृती (शेप) आणि आकार (साईज) यावर सकारात्मक परिणाम होतो.
जर एखाद्या पुरुषाला फर्टिलिटीशी संबंधित समस्या असेल, तर स्वतः उपचार न करता तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. अननस एक नैसर्गिक उपाय आहे, जो स्पर्म क्वालिटी सुधारण्यास मदत करतो, पण तो वैद्यकीय उपचाराचा पर्याय नाही.
