TRENDING:

तुम्हाला ही सेलिब्रिटी सारखं दिसायचं का? पुण्यात ‘या’ ठिकाणी करा कपड्यांची खरेदी Video

Last Updated:

पुण्यातील 'या'ठिकाणी तुम्ही सेलिब्रिटी सारख्या कपड्यांची खरेदी करू शकतात. 

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे, 09 ऑगस्ट : आज प्रत्येकाला फॅशन ट्रेंड फॉलो करायला आवडतो. आपण जास्तीत जास्त कसे चांगले दिसू यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करतो. यासाठी कधी कधी सेलिब्रिटी कलाकार, रील स्टार अशा अनेक लोकांना फॉलो करत असतो. आपण ही त्यांच्या सारखं दिसावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. त्यामुळे त्यांच्या सारखे कपडे खरेदी करण्याला प्राधान्य दिले जाते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला पुण्यातील अश्याच ठिकाणाबद्दल माहिती देणार आहोत जिथे तुम्ही सेलिब्रिटी सारख्या कपड्यांची खरेदी करू शकतात.
advertisement

कुठे कराल खरेदी?

पुण्यातील सदाशिव पेठ दुर्वांकुर हॉटेल शेजारी द मास्क शॉप आहे. 2017 साली हे शॉप अक्षय तांबे यांनी सुरु केले. या शॉपमध्ये सेलिब्रिटी कलाकार कपड्यांची खरेदी करत असतात. इथे तुम्हाला कपड्यांचे बेसिक ब्रँड नाही तर युनिक ब्रँड खरेदी करता येतात. या वेगवेगळ्या ब्रँड सोबत याच्यावर मॅचिंग ज्वेलरी, शूज, अंगठी, ब्रेसलेट अशा गोष्टी देखील याठिकाणी खरेदी करता येतात.

advertisement

यापेक्षा स्वस्त कुठे सांगा? फक्त 35 रुपयांमध्ये साडी, कुठे आहे हे मार्केट? Video

या ठिकाणी कपडे हे थायलंड, चायना, तर्की इथून मागवले जातात. तसेच भारतातून देखील पार्सल बाहेर पाठवले जातात. यासोबतच दुबई आणि साऊथ आफ्रिका इथून देखील  लोकांचा ऑनलाईन चांगला प्रतिसाद भेटतो. आम्ही क्वान्टिटी पेक्षा क्वालिटीकडे जास्त भर असतो. 750 पासून तुम्ही इथे शॉपिंग करू शकता. इतकच नव्हे तर लेडीजसाठी देखील इथे टीशर्ट आहेत. तसंच तुम्हाला कोणाला वेगळं गिफ्ट द्यायचं असेल ते देऊ शकता, अशी माहिती द मास्क शॉपचे मालक अक्षय तांबे यांनी दिली आहे.

advertisement

कोण कोणते कलाकार करतात खरेदी?

पुण्यातील हे एकमेव ठिकाण जिथे कलाकार शॉपिंग करतात आणि याच ठिकाणी तुम्हाला देखील शॉपिंग करायला मिळते. या ठिकाणी प्रसाद ओक, पूर्वा शिंदे, किरण गायकवाड, अक्षय केळकर, उत्कर्ष शिंदे असे अनेक कलाकार इथं शॉपिंगसाठी येतात. अगदी सर्वांना परवडेल अशा किंमती या ठिकाणी आहेत, असं ही अक्षय तांबे यांनी सांगितले.

advertisement

होलसेल दरात करायचीय शॉपिंग? मुंबईतील हे 4 मार्केट आहेत बेस्ट पर्याय

द मास्क शॉपचा पूर्ण पत्ता?

दुर्वांकुर हॉल शेजारी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक रोड सदाशिप पेठ इथे तुम्ही खरेदी करू शकता.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
तुम्हाला ही सेलिब्रिटी सारखं दिसायचं का? पुण्यात ‘या’ ठिकाणी करा कपड्यांची खरेदी Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल