लाल गुलाब
लाल गुलाबाबद्दल फार काही सांगायची गरज नाही. लाल गुलाबाचा अर्थ आहे आय लव्ह यू. हा गुलाब प्रेम, नात्यातलं सौंदर्य आणि एकमेकांशी असलेलं नातं यांच्याबद्दलचा सन्मान प्रतीत करणाऱ्या आणि प्रेमभावना व्यक्त करत असतो. त्यामुळेच प्रेमाच्या भावना व्यक्त करण्यासाठी लाल गुलाब हा सर्वांत योग्य पर्याय मानला जातो.
व्हॅलेंटाइन्स वीकमध्ये 'या' तारखांना सेलिब्रेट करा प्रपोझ, रोझ अन् चॉकलेट डे
advertisement
पांढरा गुलाब
तुमच्या मनात कधी कोणाबद्दल प्रेम ही भावना मनात नुकतीच निर्माण झाली आहे का? किंवा रिलेशनशिपची नुकतीच सुरुवात वगैरे झाली आहे असं काही आहे का? तसं असेल तर, प्रेम ही भावना वाटणारं, मनात असणारं आकर्षण व्यक्त करण्यासाठी पांढरा गुलाब परफेक्ट आहे. हा गुलाब प्रेमाची भाषा व्यक्त करतो आणि समोरच्या व्यक्तीला याची जाणीव करून देतो, की तुमच्या मनात त्या व्यक्तीबद्दल प्रेमाची भावना निर्माण झाली आहे आणि तुम्ही त्या व्यक्तीची निवड केली आहेत.
गुलाबी गुलाब
तुम्हाला आयुष्यात तुमचं प्रेम मिळाल्यानंतर तुम्हाला किती आनंद झाला आहे, किंवा या प्रेमाबद्दल तुम्ही किती भाग्यवान आहात हे जर तुम्हाला व्यक्त करायचं असेल किंवा समोरच्या व्यक्तीची काळजी घेणं, प्रेम करणं तुमच्यासाठी किती महत्त्वाचं आहे हे दाखवून द्यायचं असेल तर हा गुलाबी गुलाब तुम्ही द्यायला हवा. हा गुलाब आनंद, नात्यातलं सौंदर्य आणि समोरच्या व्यक्तिप्रति आभार व्यक्त करतो.
पिवळा गुलाब
मैत्रीचं नातं आणि त्या व्यक्तिप्रति तुमचं असलेलं मैत्र भावनेतलं प्रेम, स्नेह दाखविण्यासाठी पिवळा गुलाब उत्तम आहे. या रंगाचा गुलाब फक्त मित्र-मैत्रिणींनाच नव्हे तर तुमची पत्नी, गर्लफ्रेंड यांनासुद्धा देऊ शकता, जेणेकरून त्यांनासुद्धा हे समजेल की तुम्ही त्यांच्यावर फक्त प्रेमच करत नाही तर त्यांच्या आयुष्यातले एक उत्तम मित्र आहात.
केशरी गुलाब
एकमेकांबद्दल असलेली उत्कट भावना व्यक्त करण्यासाठी केशरी गुलाब दिला जातो. दोघांनाही जर परस्परांबद्दल आकर्षण वाटत असेल आणि एकमेकांच्या आयुष्यात काही खास जागा निर्माण करायची असेल तर हा केशरी गुलाब देऊन नात्याबद्दल थोडा गांभीर्याने विचार करण्यासाठी योग्य निवड आहे.
निळा गुलाब
एखादी व्यक्ती तुमच्यासाठी किती खास आहे, हे दाखविण्यासाठी निळ्या रंगाचा गुलाब दिला जातो. कारण, निळ्या रंगाचा गुलाब खूप क्वचित आढळतो. त्यामुळं याचं महत्त्व खूप खास आहे. तुमच्या आयुष्यात अनेक माणसं असतील मात्र ती एकच व्यक्ती अशी असेल, जी तुमच्यासाठी खूपच खास आहे. त्यामुळे गर्लफ्रेंड किंवा बायकोला हा गुलाब आवर्जून देऊ शकता.
पिवळा–लाल गुलाब
जर तुम्हाला कोणी आवडत असेल आणि या प्रेमातून तुमच्या नात्यात पुढे काही घडावं असं वाटत असेल तर पिवळा आणि लाल गुलाब अशा कॉम्बिनेशनमध्ये बुके तयार करून देऊ शकता. यातून असा संदेश दिला जाईल, की त्या समोरच्या व्यक्तीच्या तुम्ही आणखी जवळ जाऊ इच्छिता आणि काही नातं निर्माण करावं, अशी तुमची भावना आहे.
पांढरा–लाल गुलाब
तुमच्या आयुष्यात अगोदरच असलेली ती स्पेशल व्यक्ती तुमच्यासाठी किती परफेक्ट आहे, हे व्यक्त करण्यासाठी पांढरा आणि लाल गुलाबांचा एकत्र असा गुच्छ दिला जातो. तुमच्या दोघांमधलं नातं अधिक दृढ होणं आणि त्यासाठी तुम्ही वाट्टेल ते करायला तयार आहात, याचं हे प्रतीक मानलं जातं.
