advertisement

फेब्रुवारी महिन्याला सुरवात! व्हॅलेंटाइन्स वीकमध्ये 'या' तारखांना सेलिब्रेट करा प्रपोझ, रोझ अन् चॉकलेट डे

Last Updated:

Valentines Day 2024 : खरं तर फेब्रुवारी महिन्यात व्हॅलेंटाइन्स वीक साजरा केला जातो. त्यात रोझ डे, चॉकलेट डे, प्रपोज डे असे वेगवेगळे दिवस साजरे करून कपल्स प्रेमाचा आनंद लुटतात. हे दिवस नक्की कधी असतात, ते जाणून घ्या.

व्हॅलेंटाइन्स वीक
व्हॅलेंटाइन्स वीक
नवीन वर्ष सुरू झाल्यावर सगळी तरुणाई फेब्रुवारी महिन्याची आतुरतेनं वाट पाहत असते. कारण या महिन्यात व्हॅलेंटाइन्स डे येतो. एकमेकांच्या मनातली प्रेमभावना व्यक्त करण्यासाठी सगळे जण या दिवसाची वाट पाहत असतात. खरं तर फेब्रुवारी महिन्यात व्हॅलेंटाइन्स वीक साजरा केला जातो. त्यात रोझ डे, चॉकलेट डे, प्रपोज डे असे वेगवेगळे दिवस साजरे करून कपल्स प्रेमाचा आनंद लुटतात. हे दिवस नक्की कधी असतात, ते जाणून घ्या.
फेब्रुवारी महिन्याला प्रेमाचा महिना असंही म्हटलं जातं. व्हॅलेंटाइन्स डे 14 फेब्रुवारीला साजरा केला जातो. त्याच्या एक आठवडा आधीपासूनच व्हॅलेंटाइन्स वीक सुरू होतो. कपल्ससाठी हा आठवडा म्हणजे एखाद्या सणासारखाच असतो; यानिमित्ताने एकमेंकाना व्हॅलेंटाईन्स डे शुभेच्छा खासकरून दिल्या जातात. मात्र व्हॅलेंटाइन्स वीकमध्ये कोणकोणते दिवस कधी येतात, याबाबत काहींचा गोंधळ असतो. त्यामुळे जाणून घेऊ या व्हॅलेंटाइन्स वीकमधले हे खास दिवस कधी येणार आहेत, त्याबद्दल
advertisement
व्हॅलेंटाइन्स डे वीक 2024
7 फेब्रुवारी – रोझ डे, बुधवार
8 फेब्रुवारी – प्रपोझ डे, गुरुवार
9 फेब्रुवारी – चॉकलेट डे, शुक्रवार
10 फेब्रुवारी – टेडी डे, शनिवार
11 फेब्रुवारी – प्रॉमिस डे, रविवार
12 फेब्रुवारी – हग डे, सोमवार
advertisement
13 फेब्रुवारी – किस डे, मंगलवार
14 फेब्रुवारी - व्हॅलेंटाइन डे, बुधवार
व्हॅलेंटाइन्स डे का साजरा केला जातो?
व्हॅलेंटाइन्स डे साजरा करण्याची सुरुवात रोमचा राजा क्लॉडियसच्या काळात झाली. रोमचे पाद्री सेंट व्हॅलेंटाइन यांनी पहिल्यांदा व्हॅलेंटाइन डे साजरा करण्याची सुरुवात केली. या दिवशी आपल्या मनातल्या प्रेमभावनेला व्यक्त करून समोरच्यासोबत प्रेमाची देवाणघेवाण होते. त्या शहराचा राजा क्लॉडियसला ते मान्य नव्हतं. त्याचं असं म्हणणं होतं, की प्रेमामुळे पुरुषांची बुद्धी भ्रष्ट होते. त्यामुळे त्यानं आपल्या सैनिकांना आणि मंत्र्यांना लग्न न करण्याचे आदेश दिले होते. सेंट व्हॅलेंटाइन यांनी त्या आदेशाला विरोध केला आणि अनेक सैनिक व मंत्र्यांचं लग्न लावलं. राजाला ही गोष्ट समजल्यावर त्याला खूप राग आला. त्यानं 14 फेब्रुवारीच्या दिवशी सेंट व्हॅलेंटाइन यांना फाशीची शिक्षा दिली. त्यामुळे त्यानंतर दर वर्षी 14 फेब्रुवारीला सेंट व्हॅलेंटाइन यांचं स्मरण केलं जातं व व्हॅलेंटाइन डे साजरा केला जातो.
advertisement
व्हॅलेंटाइन्स डेच्या (Valentines Day 2024) निमित्तानं संपूर्ण फेब्रुवारी महिनाच हल्ली प्रेममय झाला आहे. त्यात आणखीही वेगवेगळे डेज साजरे केले जातात. त्यामुळे या महिन्याला प्रेमी युगलांच्या दृष्टीनं वेगळं महत्त्व आहे.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
फेब्रुवारी महिन्याला सुरवात! व्हॅलेंटाइन्स वीकमध्ये 'या' तारखांना सेलिब्रेट करा प्रपोझ, रोझ अन् चॉकलेट डे
Next Article
Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement