advertisement

Happy Valentines Day 2024 : प्रियकर-प्रेयसीला द्या व्हॅलेंटाईनच्या खास शुभेच्छा! WhatsApp ला ठेवा Status

Last Updated:

Valentines Day 2024 Wishes In Marathi : दरवर्षी 7 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी या काळात व्हॅलेंटाईन वीक साजरा करण्यात येतो. या सात दिवसांत आपल्या पार्टनरला गुलाब, चॉकलेट, गिफ्ट देऊन प्रेम व्यक्त करतात.

व्हॅलेंटाइन्स डे मराठी शुभेच्छा
व्हॅलेंटाइन्स डे मराठी शुभेच्छा
मुंबई : व्हॅलेंटाईन वीक सुरू आणि संपलासुद्धा, पण या वीकमध्ये प्रत्येक दिवस हा खूपच खास असतो. दरवर्षी 7 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी या काळात व्हॅलेंटाईन वीक साजरा करण्यात येतो. या सात दिवसांत आपल्या पार्टनरला गुलाब, चॉकलेट, गिफ्ट देऊन प्रेम व्यक्त करतात. तर अनेकजण 14 फेब्रुवारी म्हणजेच व्हॅलेंटाईन डेच्या (Valentines Day 2024) दिवशी आपल्या आवडत्या व्यक्तीला प्रपोज करुन प्रेम व्यक्त करतात.
याच व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा (Valetines Day Wishes In Marathi) देणारे मेसेजेस सोशल मीडियात व्हायरल होत आहेत. सोशल मीडियात व्हायरल होणारे असेच काही मेसेजेस आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. या मेसेजेसच्या माध्यमातून तुम्ही व्हॅलेंटाईन डे च्या शुभेच्छा (Valentines Day Quotes In Marathi) देऊ शकता.
तुझ्या मिठीत आल्यावर असं वाटतं, वेळेनं पण थोडं थांबावं…
advertisement
आणि तुझ्या माझ्या प्रेमाचं हे नातं, आयुष्यभर असंच रहावं….
Happy Valentine’s Day
खूप लोकांना वाटते की,
I LOVE YOU हे जगातील सुंदर शब्द आहेत
पण खरं तर…
I LOVE YOU TOO हे जागातील सर्वात सुंदर शब्द आहेत
Happy Valentine’s Day
advertisement
प्रेमाचा अर्थ कधी कळलाच नव्हता
जेव्हा तू माझ्या आयुष्यात नव्हता
प्रेमाचा अर्थ तेव्हा कळाला
जेव्हा तू मला मिळाला
Happy Valentine’s Day
डोळ्यातल्या स्वप्नाला कधी प्रत्यक्षातही आण
किती प्रेम करतो तुझ्यावर, हे न सांगताही जाण…
Happy Valentine’s Day
ना Rose पाहिजे
ना Chocolates पाहिजे
ना Teddy पाहिजे
ना Kiss पाहिजे
advertisement
फक्त तुझी आयुष्यभर साथ पाहिजे
Happy Valentine’s Day
तुझ्या चेहऱ्यावरचा राग तुझ्यासारखाच गोड आहे
म्हणूनच माझ्या मनाची तुझ्याकडे ओढ आहे
Happy Valentine’s Day
स्टेटस आवडतो म्हणणारे खूप आहेत
पण तू आवडतोस म्हणणारी फक्त तूच आहेस
Happy Valentine’s Day
तुझ्यासारखा जोडीदार आयुष्यात आल्याने
advertisement
मनातल्या राजकुमाराचे स्वप्न झाले साकार
आज वॅलेंटाईन डे च्या दिवशी
करते मी तुझ्या प्रेमाचा स्वीकार
Happy Valentine’s Day
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Happy Valentines Day 2024 : प्रियकर-प्रेयसीला द्या व्हॅलेंटाईनच्या खास शुभेच्छा! WhatsApp ला ठेवा Status
Next Article
Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement