advertisement

Valentine Day 2024: 'व्हॅलेंटाईन डे'ला नवरा-बायकोंनी एकमेकांना भेट द्याव्या या गोष्टी, बहरेल प्रेम

Last Updated:

Valentine Day 2024 : अनेकजण 14 फेब्रुवारीची म्हणजेच 'व्हॅलेंटाईन डे'ची वाट पाहत असतात. ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार पंडित हितेंद्रकुमार शर्मा यांच्याकडून जाणून घेऊ वास्तुनुसार आपण जोडीदाराला कोणती भेटवस्तू देऊ शकतो.

News18
News18
मुंबई, 26 जानेवारी : फेब्रुवारीला प्रेमाचा महिना म्हणतात. प्रियकर-प्रेमिकांसाठी हा महिना खास आहे, कारण याच महिन्यात व्हॅलेंटाईन डे येतो. एकमेकांच्या प्रेमात असणारे हा दिवस संस्मरणीय करण्याचा प्रयत्न करतात. आपल्या जोडीदाराला काही खास गिफ्ट देऊन खुश केलं जातं. भेटवस्तू देऊन प्रेम व्यक्त करण्याची परंपरा आहे. अनेकजण 14 फेब्रुवारीची म्हणजेच 'व्हॅलेंटाईन डे'ची वाट पाहत असतात. ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार पंडित हितेंद्रकुमार शर्मा यांच्याकडून जाणून घेऊ वास्तुनुसार आपण जोडीदाराला कोणती भेटवस्तू देऊ शकतो.
वास्तुनुसार भेटवस्तू द्या -
1. बांबू वनस्पती - वास्तुशास्त्रानुसार बांबूचे रोप खूप शुभ मानले जाते. बांबू ही वनस्पती प्रगती आणि समृद्धीचे सूचक देखील मानले जाते. तुम्ही तुमच्या जोडीदाराला व्हॅलेंटाईन डेला बांबूचे रोप गिफ्ट केले तर तुमचे नाते घट्ट राहील.
2. लाफिंग बुद्ध - व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी तुम्ही तुमच्या जोडीदाराला लाफिंग बुद्धाची मूर्ती भेट देऊ शकता. वास्तुशास्त्रानुसार लाफिंग बुद्धाला शुभ मानलं जातं. लाफिंग बुद्धाची मूर्ती घरात ठेवल्यानं शांतता कायम राहते.
advertisement
3. फुले भेट द्या - वास्तुशास्त्रानुसार फुले भेट देणे देखील शुभ मानले जाते. व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी तुम्ही तुमच्या जोडीदाराला लाल आणि गुलाबी रंगाची फुले देऊ शकता. मात्र, फुले देताना त्याला काटे नसावेत याची, काळजी घ्या. काट्यांमुळे नातेसंबंधात संघर्ष होऊ शकतो.
advertisement
4. भेटवस्तूच्या आवरणाचा रंग कोणता असावा?
जर तुम्ही तुमच्या जोडीदाराला यापैकी एखादी भेटवस्तू देणार असाल तर त्या भेटवस्तूच्या कागदाचा रॅपिंग कोणत्या रंगाचा असावा, या विषयी काळजी घ्या. रॅपिंगसाठी सोनेरी, लाल, गुलाबी, पिवळे रंग वापरा.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view comments
मराठी बातम्या/अध्यात्म/
Valentine Day 2024: 'व्हॅलेंटाईन डे'ला नवरा-बायकोंनी एकमेकांना भेट द्याव्या या गोष्टी, बहरेल प्रेम
Next Article
SRH vs LSG : 10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
  • रिषभ पंतने मॅच जिकवली

  • लखनऊच्या विजयाच्या पडद्यामागचा हिरो

  • 4 ओव्हरमध्ये अख्खी मॅच फिरवली

View All
advertisement