advertisement

यंदाचा Valentine's Day खास! अत्यंत दुर्मीळ योग, 3 राशींच्या व्यक्तींनी बिनधास्त करावं Enjoy

Last Updated:

येत्या 14 फेब्रुवारीला सरस्वती पूजन साजरं केलं जाईल. तब्बल 100 वर्षांनी यंदा सरस्वती पूजन रेवती नक्षत्राच्या पंचमी तिथीला आणि बुधवारी असणार आहे. त्यामुळे निश्चितच याचा विविध राशींवर परिणाम होईल.

आपल्यासाठी हा दिवस अतिशय चांगला असेल.
आपल्यासाठी हा दिवस अतिशय चांगला असेल.
परमजीत कुमार, प्रतिनिधी
देवघर : ज्योतिषशास्त्रात सरस्वती पूजनाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी ज्ञान, विद्या आणि कलेची देवता मानल्या जाणाऱ्या सरस्वती देवीची मनोभावे विधीवत पूजा केली जाते. त्यामुळे आपली प्रचंड प्रगती होते, अशी मान्यता आहे. वसंत पंचमीला सरस्वती पूजन केलं जातं. विशेष बाब अशी की, यंदाची वसंत पंचमी प्रेमाच्याच दिवशी (Valentine's Day) म्हणजे 14 फेब्रुवारीला आहे. हा दिवस आपल्यासाठी दरवर्षी खास असतो, परंतु यंदा ज्योतिषशास्रानुसारही तो उत्तम असणार आहे. कारण त्याच दिवशी अत्यंत दुर्मीळ असे योग निर्माण होणार आहेत.
advertisement
झारखंडच्या देवघरचे प्रसिद्ध ज्योतिषी पंडित नंदकिशोर मुद्गल यांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या 14 फेब्रुवारीला सरस्वती पूजन साजरं केलं जाईल. तब्बल 100 वर्षांनी यंदा सरस्वती पूजन रेवती नक्षत्राच्या पंचमी तिथीला आणि बुधवारी असणार आहे. त्यामुळे निश्चितच त्याचा विविध राशींवर परिणाम होईल. मग काही राशींना त्यातून फायदा मिळेल, तर काही राशींच्या व्यक्तींना मात्र दु:ख सोसावं लागेल.
advertisement
या दिवशी शुक्ल योग, अमृत सिद्धी योग आणि रवी योगासह अनेक योग निर्माण होणार आहेत. या दिवसात सर्वात खास योग आहे 'शिववास'. त्यामुळे विद्यार्थ्यांना सरस्वती देवीचा विशेष आशीर्वाद मिळेल. महत्त्वाचं म्हणजे या दिवशी पूजेसाठी कोणताही मुहूर्त नाही, तर आपण दिवसभरात कधीही पूजा करू शकता. काही राशींच्या व्यक्तींना ही पूजा विशेष लाभणार आहे. त्यामुळे व्हॅलेंटाइन्स डे कोणत्या राशींसाठी खरोखर प्रेम घेऊन येणार, पाहूया.
advertisement
कर्क : आपल्यासाठी हा दिवस अतिशय चांगला असेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात सकारात्मक बदल पाहायला मिळतील. स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष फायदा मिळेल.
कन्या : आपली थांबलेली सर्व कामं या दिवशी निर्माण होणाऱ्या योगांमुळे मार्गी लागतील. आपण आपल्या खोलीत सरस्वती देवीचा फोटो लावणं आपल्यासाठी फायदेशीर ठरेल. त्यामुळे अभ्यासात मन लागेल, एकाग्रता वाढेल.
advertisement
तूळ : आपल्याला या दिवशी आपल्या मेहनतीचं फळ मिळणार आहे. निकालात ते पाहायला मिळेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात फायदा होईल. एकाग्रतेने अभ्यास करू शकाल. आपण पूजेच्यावेळी सरस्वती देवीला चंदन अर्पण करणं आपल्यासाठी फायदेशीर ठरेल.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला करा फॉलो...या लिंकवर क्लिक करा
view comments
मराठी बातम्या/अध्यात्म/
यंदाचा Valentine's Day खास! अत्यंत दुर्मीळ योग, 3 राशींच्या व्यक्तींनी बिनधास्त करावं Enjoy
Next Article
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement