तुम्हीपण चप्पला घरात घेऊन जाता? ही सवय आजच बदला बरं, नाहीतर आणखी येतील अडचणी
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
घराची सुरुवात ही दरवाजापासून होते आणि दरवाजावरूनच त्या घराची, घरातल्या माणसांची ओळख पटते. त्यामुळे घराचा मुख्य दरवाजा कायम नीटनेटका आणि स्वच्छ असायला हवा.
शिखा श्रेया, प्रतिनिधी
रांची : सुख-सुविधांयुक्त आयुष्य जगायचं असेल, शरीर सुदृढ ठेवण्यासाठी चांगल्या दर्जाचे पदार्थ खायचे असतील, चांगले उपचार घ्यायचे असतील, तर हातात पैसे हवे. त्यासाठीच आपण सर्वजण कष्ट करून पैसे कमवतो. शिवाय आपल्यावर लक्ष्मी देवीची कृपा राहावी म्हणून देवपूजा करतो. अनेकजण घरात लक्ष्मीचं आगमन होण्यासाठी वास्तूशास्त्रानुसार वस्तूंची मांडणी करतात, घरात साफसफाई ठेवतात. परंतु कळत, नकळतपणे आपल्याकडून अशा काही चुका होतात, ज्यामुळे घरात लक्ष्मीचं आगमन होत नाहीत, परंतु नकारात्मक ऊर्जा मात्र मोठ्या प्रमाणात येते.
advertisement
घराची सुरुवात ही दरवाजापासून होते आणि दरवाजावरूनच त्या घराची, घरातल्या माणसांची ओळख पटते. त्यामुळे घराचा मुख्य दरवाजा कायम नीटनेटका आणि स्वच्छ असायला हवा. शिवाय वास्तूशास्त्रात या दरवाज्याविषयी काही नियम सांगितलेले आहेत, तेसुद्धा आपण पाळायला हवे, तरच घरात सुख, समृद्धी आणि शांततेचं वातावरण नांदतं.
advertisement
झारखंडची राजधानी असलेल्या रांचीमधील नामवंत ज्योतिषी संतोष कुमार चौबे यांनी दिलेल्या माहितीनुसार, घराच्या उंबरठ्यावर कधीच अशा गोष्टी ठेऊ नये ज्यामुळे आलेली लक्ष्मी माघारी फिरेल. कधीकधी आपण घराच्या उंबरठ्यावर बसतो आणि गप्पागोष्टी करतो. वास्तूशास्त्रात हे अत्यंत अशुभ मानलं जातं. ज्योतिषशास्त्रानुसार, घराच्या मुख्य दरवाजात राखणदाराचं स्थान असतं. त्या राखणदारावरच आपण बसलात तर घरात होत्याचं नव्हतं झालंच म्हणून समजायचं. शिवाय उंबरठ्यावर जर घाण असेल, तर तिथे लक्ष्मी देवी चुकूनही येत नाही.
advertisement
अनेकजण उंबरठ्यावर बसल्या बसल्या चहा पितात आणि पेला तिथेच ठेवतात, जेवल्यावर तिथे खरकटंही सांडतात, जे वास्तूशास्त्रानुसार अत्यंत चुकीचं आहे. शिवाय कधीच उंबरठ्याच्या आत चप्पला आणू नये. घर हे एक पवित्र ठिकाण आहे, तिथे लक्ष्मी यावी असं वाटत असेल तर ते पवित्रचं ठेवावं. तिथे कायम प्रसन्न वातावरण राहील याची काळजी घ्यावी. तरच घरात लक्ष्मीचा वास निर्माण होईल आणि घरातल्या व्यक्तींची आर्थिक भरभराट होईल.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनलला करा फॉलो… या लिंकवर क्लिक करा
Location :
Ranchi,Jharkhand
First Published :
January 29, 2024 6:34 PM IST