नेपाळच्या Gen-Z चा हिरो बालेन शाहने केला होता भारतीय चित्रपटाला विरोध, काय आहे 2 वर्षांपूर्वीचं प्रकरण?
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
नेपाळमध्ये राजकीय अस्थिरतेत के. पी. ओली शर्मा यांनी राजीनामा दिला असून बालेन शाह यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार येण्याची शक्यता आहे. तरुणाईमध्ये बालेन शाह लोकप्रिय आहेत.
advertisement
advertisement
बालेन शाह हे केवळ एक राजकीय नेते नसून, ते तरुणाईचे आयडॉल आहेत. ‘टाईम मॅगझीन’ आणि ‘न्यूयॉर्क टाईम्स’नेही त्यांची दखल घेतली आहे. सोशल मीडियावर त्यांच्या पोस्ट्स अनेकदा राष्ट्रीय चर्चेचा विषय बनल्या आहेत. त्यांची जीवनशैली, विचारसरणी आणि व्यक्तिमत्त्व नव्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे, त्यामुळेच जनरेशन-झेडच्या या आंदोलनात त्यांची महत्त्वाची भूमिका आहे.
advertisement
२०२३ मध्ये ‘आदिपुरुष’ नावाचा चित्रपट आला होता. त्यावेळी काठमांडूचे महापौर असलेले बालेन शाह यांनी या चित्रपटातील काही संवादांवर जोरदार आक्षेप घेतला होता. त्यांनी हे संवाद चित्रपटातून काढून टाकण्याची मागणी केली होती आणि तसं न केल्यास नेपाळमध्ये कोणताही भारतीय चित्रपट चालू देणार नाही, असा थेट इशारा दिला होता. त्यांच्या या भूमिकेमुळे ते चर्चेत आले होते.
advertisement
advertisement
advertisement