फेब्रुवारीत कोणाचं नशीब पालटणार, कोणते ग्रह चाल बदलणार? वैवाहिक जीवनात सुख येणार!
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
फेब्रुवारी महिन्यात ग्रहांचा विविध राशींवर मोठ्या प्रमाणात प्रभाव पडणार आहे. त्यामुळे अनेक राशींच्या व्यक्ती मालामाल होतील.
सर्वेश श्रीवास्तव, प्रतिनिधी
अयोध्या : ज्योतिषशास्त्रात ग्रह, ताऱ्यांच्या स्थितीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ग्रह, नक्षत्रांचं राशीपरिवर्तनसुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण मानलं जातं. कारण त्याचा सर्व 12 राशींवर परिणाम होतो. यंदा अनेक ग्रह वेगवेगळ्या राशींमध्ये प्रवेश करणार आहेत. त्याचा अर्थातच काही राशींना फायदा होईल, तर काही राशींना मात्र दुःख सोसावं लागेल.
आता लवकरच वर्षातला पहिला महिना संपणार असून प्रेमाचा अर्थात फेब्रुवारी महिना सुरू होणार आहे. या महिन्यात अनेक ग्रहांचं राशीपरिवर्तन होईल. अयोध्येचे ज्योतिषी पंडित कल्की राम यांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रहांच्या राशीप्रवेशाची सुरुवात या महिन्याच्या पहिल्याच दिवसापासून होणार आहे. 1 फेब्रुवारीला बुध ग्रह मकर राशीत प्रवेश करेल. त्यानंतर 5 फेब्रुवारीला मंगळसुद्धा याच राशीत येईल. म्हणजेच मकर राशीत बुध आणि मंगळ ग्रहाची युती होईल.
advertisement
त्यानंतर 8 फेब्रुवारीला बुध मकर राशीबाहेर पडून धनू राशीत अदृश्य स्वरूपात प्रवेश करेल, तर 11 फेब्रुवारीला शनी कुंभ राशीत अदृश्य होईल. त्याच्या पुढच्या दिवशी म्हणजेच 12 फेब्रुवारीला शुक्र ग्रहाचा मकरप्रवेश होईल. तर, बुध ग्रह 13 फेब्रुवारीला कुंभ राशीत प्रवेश करेल. इतकंच नाही, तर 20 फेब्रुवारीला पुन्हा एकदा बुध ग्रहाचा कुंभ प्रवेश होईल. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यात ग्रहांचा विविध राशींवर मोठ्या प्रमाणात प्रभाव पडणार आहे आणि त्यामुळे अनेक राशींच्या व्यक्ती मालामाल होणार आहेत, असं ज्योतिषी म्हणाले.
advertisement
खरंतर ग्रहांच्या स्थानबदलाचा सर्व राशींवर परिणाम होईल. परंतु त्यापैकी मकर, मेष, कर्क, कन्या आणि तूळ राशींना विशेष लाभ होणार आहे. या राशींच्या व्यक्तींची नोकरीत प्रगती होईल. व्यवसाय विस्तारेल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आर्थिक बचत चांगली होईल. दाम्पत्य जीवनात आनंद येईल. बऱ्याच काळापासून अडकलेले पैसे या महिन्यात आपल्याला परत मिळतील.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनलला करा फॉलो… या लिंकवर क्लिक करा
Location :
Ayodhya,Faizabad,Uttar Pradesh
First Published :
January 29, 2024 2:44 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
फेब्रुवारीत कोणाचं नशीब पालटणार, कोणते ग्रह चाल बदलणार? वैवाहिक जीवनात सुख येणार!