मागच्या सीटवरून येत होता 'आह आह' आवाज, ड्रायव्हर घाबरला, आशा भोसलेंनी सांगितला होता 'तो' किस्सा

Last Updated:

Asha Bhosle : 'आजा आजा मैं हूं प्यार तेरा' हे गाणं जितकं लोकप्रिय आहे, त्यापेक्षाही जास्त रंजक आहे त्याच्यामागची गोष्ट! आशा ताईंनी एका मुलाखतीत हा किस्सा शेअर केला आहे.

News18
News18
मुंबई : भारतीय संगीतसृष्टीची 'स्वरसम्राज्ञी' आशा भोसले आणि प्रसिद्ध संगीतकार आर. डी. बर्मन यांची जोडी खूप लोकप्रिय होती. त्यांनी अनेक हिट गाणी दिली, ज्याची जादू आजही कायम आहे. असंच एक गाणं म्हणजे 'तिसरी मंजिल' चित्रपटातील 'आजा आजा मैं हूं प्यार तेरा'. हे गाणं जितकं लोकप्रिय आहे, त्यापेक्षाही जास्त रंजक आहे त्याच्यामागची गोष्ट! आशा ताईंनी एका मुलाखतीत हा किस्सा शेअर केला आहे.

"माझ्या श्वासोच्छ्वासावर नियंत्रणच नव्हतं!"

२०१० साली आशा भोसले यांनी 'इंडियन आयडल'च्या मंचावर हा किस्सा सांगितला होता. त्या म्हणाल्या, “पंचम दा जेव्हा माझ्याकडे हे गाणं घेऊन आले, तेव्हा मला वाटलं की हे एक सामान्य गाणं आहे. पण, जेव्हा मी 'आह आह आजा, आह आह आजा' हा भाग ऐकला, तेव्हा मला समजलं की या गाण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागेल. कारण, हे गाणं गाण्यासाठी श्वासोच्छ्वासावर नियंत्रण असणं खूप गरजेचं होतं.” या गाण्यासाठी आशा ताईंनी तब्बल आठ दिवस रिहर्सल केली होती.
advertisement

"ड्रायव्हरला वाटलं मेडिकल इमर्जन्सी आहे!"

आशा ताईंनी पुढे सांगितलं की, गाण्याची रिहर्सल करण्यासाठी त्या गाडीतही सराव करायच्या. त्या म्हणाल्या, “एकदा मी गाडीत 'आह आह आजा, आह आह आजा' असं गात होते. तेव्हा माझ्या ड्रायव्हरला असं वाटलं की मला काहीतरी मेडिकल इमर्जन्सी आली आहे. तो मला हाजी अलीमध्ये उतरला आणि लगेच म्हणाला, 'ताई, तुम्हाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ का? मला वाटलं तुम्हाला श्वास घेता येत नाहीये.'
advertisement
आशा ताईंच्या या बोलण्याने सगळ्यांनाच हसू आवरता आलं नाही. त्यांच्या ड्रायव्हरला वाटलं होतं की, आशा ताईंना धाप लागली आहे आणि त्यांची तब्येत खराब झाली आहे. पण, त्याला काय माहीत की, हे गाणं त्यांच्या आवाजातील एक एव्हरग्रीन गाणं बनणार होतं!
मराठी बातम्या/मनोरंजन/
मागच्या सीटवरून येत होता 'आह आह' आवाज, ड्रायव्हर घाबरला, आशा भोसलेंनी सांगितला होता 'तो' किस्सा
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement