Mumbai Traffic : जुहू चौपाटीकडे जाणे टाळा! छठपुजेमुळे वाहतूक व्यवस्थेत मोठा फेरबदल; पोलिसांनी जाहीर केले 'हे' पर्यायी मार्ग
Last Updated:
Traffic Diversion Near Juhu Chowpatty : मुंबईतील जुहू चौपाटी परिसरात छठपूजेच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. पोलीस प्रशासनाने पर्यायी मार्ग जाहीर केले असून नागरिकांना वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
मुंबई : मुंबई शहरातून दररोज वाहनांनी प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. जुहू चौपाटी परिसरात छठ पूजेच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. आज आणि उद्या छठपूजा साजरी होणार असून या काळात मोठ्या संख्येने भाविक जुहू चौपाटी आणि सांताक्रूझ परिसरात एकत्र येण्याची शक्यता आहे. या कारणामुळे गर्दी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मुंबई पोलिसांनी 26 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजेपासून ते 28 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत वाहतूक बदल लागू केले आहेत.
'ही' आहेत नो पार्किंग क्षेत्र
आपत्कालीन सेवा आणि पोलिस वाहनांव्यतिरिक्त इतर कोणत्याही वाहनांना खालील रस्त्यांवर उभे करण्यास मनाई करण्यात आली आहे , ज्यात जुहू तारा रोड, ए. बी. नायर रोड तसेच जुहू चर्च रोड आणि बिलो लेन (व्ही. एम. रोड) या रस्त्यांवर दोन्ही बाजूंना पार्किंग बंद राहील.
'या' मार्गावर असेल प्रवेश बंदी
जुहू तारा रोड हा सांताक्रूझ पोलिस ठाणे चौक ते जुहू चौपाटी तसेच ट्यूलिप स्टार हॉटेल चौक ते जुहू चौपाटी या दरम्यान आवश्यकतेनुसार वाहतुकीसाठी बंद ठेवला जाणार आहे. या रस्त्यांवर फक्त छठपूजेतील वाहनेच जाऊ शकतील अशी माहिती समोर आलेली आहे.
advertisement
पर्यायी मार्ग कोणते?
लिंक रोडकडून जुहू तारा रोडकडे येणाऱ्या वाहनांनी सांताक्रूझ पोलिस ठाणे चौक येथे उजवीकडे वळावे त्यानंतक स्टँडर्ड चार्टर्ड बँक चौक येथे डावीकडे वळून एस. व्ही. रोडमार्गे प्रवास करावा. ट्यूलिप स्टार हॉटेल चौकाकडून येणाऱ्या वाहनांना व्ही. एम. रोडमार्गे वळविण्यात येईल.
अशी असेल एकमार्गी वाहतूक
ए. बी. नायर रोड हा चर्च रोड ते बलराज साहनी मार्ग या दिशेने एकमार्गी ठेवण्यात येणार आहे.
advertisement
अतिरिक्त पर्यायी मार्ग कोणते?
वाहनचालकांनी एन. एस. रोड क्र. 13, जुहू चर्च रोड किंवा अल्फ्रेडो क्रिओडो रोड या मार्गांचा वापर करून प्रवास करावा अशी सूचना देण्यात आली आहे.
यू-टर्न बंदी असेल 'या' मार्गांवर
हॉटेल महाराजा भोगसमोरील यू-टर्न हा दक्षिणेकडून ट्यूलिप स्टार हॉटेलमार्गे जुहू कोळीवाड्याकडे जाणाऱ्या वाहनांसाठी बंद राहील. वाहनचालकांनी कोळीवाडा चौकातील यू-टर्नचा वापर करावा.
advertisement
मुंबई पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की गर्दीच्या ठिकाणी अनावश्यक वाहन वापर टाळावा तसेच वाहतूक नियंत्रणासाठी नियुक्त पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे आणि दिलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करून प्रवास करावा. या उपाययोजनांमुळे छठपूजेच्या दिवशी होणारी गर्दी आणि वाहतूक कोंडी टाळण्यास मदत होईल.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 27, 2025 8:09 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Traffic : जुहू चौपाटीकडे जाणे टाळा! छठपुजेमुळे वाहतूक व्यवस्थेत मोठा फेरबदल; पोलिसांनी जाहीर केले 'हे' पर्यायी मार्ग


