advertisement

Hanuman Jayanti 2026 : महाराष्ट्रातील एकमेव शयनावस्थेतील हनुमान मंदिर, दर्शनासाठी पायी चालत येतात भाविक, असा आहे इतिहास

Last Updated:
मंदिराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथे भगवान हनुमानाची शयन (झोपलेल्या) अवस्थेतील मूर्ती आहे. महाराष्ट्रात अशी मूर्ती असलेले हे एकमेव मंदिर असून संपूर्ण भारतात अशा प्रकारची केवळ तीन मंदिरे आहेत.
1/5
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अनेक ऐतिहासिक आणि धार्मिक मंदिरे आहेत, त्यापैकीच खुलताबाद येथील भद्रा मारुतीचे मंदिर विशेष महत्त्वाचे मानले जाते. हे मंदिर छत्रपती संभाजीनगर शहरापासून सुमारे 25 किलोमीटर अंतरावर असून जगप्रसिद्ध वेरूळ लेण्यांपासून केवळ 3 किलोमीटर अंतरावर वसलेले आहे.

2/5
खुलताबादचे प्राचीन नाव भद्रावती तसेच रत्नापूर असे होते. या ठिकाणी असलेले भद्रा मारुती मंदिर हे अत्यंत प्राचीन मानले जाते. मंदिराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथे भगवान हनुमानाची शयन (झोपलेल्या) अवस्थेतील मूर्ती आहे. महाराष्ट्रात अशी मूर्ती असलेले हे एकमेव मंदिर असून संपूर्ण भारतात अशा प्रकारची केवळ तीन मंदिरे आहेत. खुलताबाद येथील भद्रा मारुती, प्रयागराज येथील मंदिर आणि मध्यप्रदेशातील जाम सवाली येथील मंदिर.

3/5
‎पौराणिक कथेनुसार, भद्रावती नगरीत भद्रसेन नावाचा राजा राज्य करत होता. तो भगवान रामाचा अत्यंत भक्त होता. रामभक्तीत तल्लीन होऊन तो कीर्तन गात असताना हनुमानजी त्या ठिकाणी प्रकट झाले. त्या भक्तीने प्रभावित होऊन त्यांनी भावसमाधी धारण केली आणि शयनावस्थेत तेथे स्थिरावले. राजाच्या विनंतीनुसार ते तेथेच राहिले आणि त्या घटनेनंतर या मंदिराला भद्रा मारुती म्हणून ओळख मिळाली.

4/5
मध्ययुगीन काळात या परिसरावर मुघलांचे राज्य होते. औरंगजेबाच्या काळातील अनेक कबरी आजही खुलताबाद परिसरात पाहायला मिळतात, ज्यातून त्या काळाचा इतिहास दिसून येतो. तरीही या मंदिराची परंपरा अखंडित राहिली.

5/5
‎भद्रा मारुती हे नवसाला पावणारे मंदिर म्हणून ओळखले जाते. विशेषतः हनुमान जयंती (चैत्र पौर्णिमा) निमित्त येथे मोठी यात्रा भरते. या काळात छत्रपती संभाजीनगर शहरातून हजारो भाविक पायी चालत येतात. तसेच मंगळवार आणि शनिवार या दिवशीही मोठ्या प्रमाणावर भाविक दर्शनासाठी उपस्थित राहतात.

PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement