धारावीच्या झोपडपट्टीत बालपण, पैशांपायी सोडली शाळा; अभिनेता आज 225 कोटींच्या संपत्तीचा मालक
- Published by:Minal Gurav
Last Updated:
बॉलिवूडचा अभिनेता ज्याचं बालपण धारावीच्या झोपडपट्टीत गेलं. आज तो कोट्यवधींच्या संपत्तीचा मालक आहे.
advertisement
advertisement
advertisement
आपण बोलत आहेत अभिनेते, कॉमेडियन जॉनी लिव्हर यांच्याविषयी. त्यांचं खर नाव जॉन प्रकाश राव जनुमाला आहे. त्यांचा जन्म मुंबईतील एका तेलगू ख्रिश्चन कुटुंबात झाला. त्यांचं बालपणी धावारीच्या झोपडपट्टीत देलं. लहानपणी अनेक अडचणींचा सामना केला पण जॉनी यांनी कधीही हार मानली नाही. स्वतःच्या हिमतीवर कोट्यवधी रुपयांचं साम्राज्य उभं केलं.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
त्याच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा तेव्हा आला जेव्हा प्रसिद्ध अभिनेते सुनील दत्त यांनी चित्रपटांमध्ये संधी दिली. यानंतर जॉनी लिव्हरने कधीही मागे वळून पाहिलं नाही. 1990 च्या दशकात जॉनी लिव्हर बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय विनोदी कलाकारांपैकी एक बनला. त्यांनी 300 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आणि प्रत्येक वेळी आपल्या अनोख्या शैलीने प्रेक्षकांना हसवले.
advertisement
त्यांनी शाहरुख खान, सलमान खान, अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांसारख्या मोठ्या कलाकारांसोबत काम केले. 'बाजीगर', 'करण अर्जुन', 'दुल्हे राजा' आणि 'दे दाना दान' यांसारख्या चित्रपटांमधील त्याच्या भूमिका आजही प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहेत. जॉनी लिव्हरचं वैशिष्ट्य केवळ त्याचा विनोद नाही तर त्यांचं टायमिंग आणि हावभावही आहेत. ते अगदी लहान दृश्यांनाही अविस्मरणीय बनवू शकतो. यामुळेच मल्टी-स्टारर चित्रपटांमध्येही त्यांनी काम केलं
advertisement
आपल्या कठोर परिश्रमातून आणि समर्पणातून जॉनी लिव्हर धारावीच्या अरुंद गल्ल्यांमधून मुंबईच्या उच्चभ्रू लोखंडवाला परिसरात पोहोचले. आज जॉनी आपल्या कुटुंबासह एका डुप्लेक्समध्ये राहतात. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांची सध्याची एकूण संपत्ती अंदाजे 255 कोटी रुपये आहे. जॉनीच्या पावलावर पाऊल ठेवत, त्याची मुलगी जेमी लिव्हर देखील या क्षेत्रात स्वतःचे नाव कमावत आहे.







