मोठी बातमी! भाजप कार्यालयाबाहेर मोठा स्फोट, पोलीस घटनास्थळी दाखल
- Published by:Prachi Amale
Last Updated:
पोलीस आणि अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी पोहचले असून पोलिसांनी आसपासचा परिसर सील केला आहे.
चंदीगड : चंदीगडमधून मोठी बातमी समोर येत आहे. दुपारी सेक्टर 37 येथील भाजपच्या कार्यालयाबाहेर मोठा स्फोट झाला आहे. स्फोटानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. स्फोट एवढा भीषण होता की त्याचा आवाज बराच दूरपर्यंत ऐकू आल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. पोलीस घटनास्थळी पोहचले असून सुदैवाने कोणतीही जीवीतहानी झाली नाही.
समोर आलेल्या माहितीनुसार, संध्याकाळी साडे चारच्या सुमारास हा स्फोट झाला असून पार्किंग परिसरातील अनेक गाड्यांचे नुकसान झाले आहे. या स्फोटामुळे वाहनांचे नुकसान देखील झाले आहे. पोलीस आणि अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी पोहचले आहे. पोलिसांनी आसपासचा परिसर सील केला आहे. अद्याप स्फोटाचे नेमके कारण समोर आलेले नाही. नेमका कसला स्फोट होता? याचा तपास पोलीस करत आहे. परिसरात मात्र हा बॉम्ब ब्लास्ट असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. स्फोटानंतर काही फोटो समोर आले आहेत. फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहचली आहे.
advertisement
पोलीस काय म्हणाले?
पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, येथे झालेला स्फोट हा कमी तीव्रतेचा म्हणजेच लो-इंटेंसिटी ब्लास्ट असल्याचं स्पष्ट झालं आहे. सध्या घटनास्थळी सुरक्षा वाढवण्यात आली असून तपास यंत्रणा सक्रिय झाली आहे. या घटनेमागील नेमकं कारण काय, याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे, अधिक तपशीलांची प्रतीक्षा आहे.
भाजप नेते आणि चंदिगडच्या महापौरांचा भाऊ विनीत जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही वाहनांचे नुकसान झाले आहे आणि काही ठिकाणी स्फोटाचा आवाज देखील आला. त्यानंतर पोलिसांनी सूचना देण्यात आली आहे. सध्या चंदिगड पोलीस आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही तपासत आहे. महत्त्वाचे म्हणजे स्फोट झालेल्या जागेपासून काही अंतरावर पेट्रोल पंप आणि वकिलांचे चेंबर्स देखील आहेत.
Location :
Delhi
First Published :
Apr 01, 2026 6:29 PM IST









