advertisement

वय अवघे 3 वर्षे, तब्बल 50 गड-किल्ल्यांवर रायाजीने केली यशस्वी चढाई, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद

Last Updated:
पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील ओझर्डे गावचा रायाजी घारे हा चिमुकला महाराष्ट्रातील सर्वात लहान गिरीरोहक ठरला आहे. त्याने आतापर्यंत तब्बल 50 गड-किल्ल्यांवर यशस्वी चढाई करत इतिहास रचला आहे. (गणेश दुडम, प्रतिनिधी)
1/5
प्रत्येकालाच कशा ना कशाची आवड असतेच. तिच आवड जपत अनेक जण आपला छंद जोपासत असतात. यामध्ये अगदी आपल्याला लहान मुलं ही पाहिला मिळतात. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील ओझर्डे गावचा रायाजी घारे हा चिमुकला महाराष्ट्रातील सर्वात लहान गिरीरोहक ठरला आहे. त्याने आतापर्यंत तब्बल 50 गड-किल्ल्यांवर यशस्वी चढाई करत इतिहास रचला आहे. विशेष म्हणजे, अवघ्या 40 दिवसांत महाराष्ट्र आणि गुजरातमधील तीन सर्वोच्च शिखरे सर करत त्याने विक्रम नोंदवला असून, या उल्लेखनीय कामगिरीची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये करण्यात आली आहे.

2/5
रायाजीचा गडभ्रमंतीचा प्रवासही तितकाच प्रेरणादायी आहे. त्याने वयाच्या केवळ 1 वर्षे 8 महिन्यांपासून गड-किल्ल्यांची ओढ जपली. 14 नोव्हेंबर 2023 रोजी दुर्गेश्वर रायगडापासून त्याच्या मोहिमेला सुरुवात झाली. वडील सुधीर घारे, आई प्रिया आणि बहीण श्रीजा यांच्या सहवासात तो गड-दुर्गांची सफर करत आहे.

3/5
11 जानेवारी 2024 रोजी रायाजीने महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसूबाई (5,400 फूट) अवघ्या 4 तास 20 मिनिटांत सर केले. त्यानंतर 27 जानेवारीला साल्हेर किल्ला (5,157 फूट) आणि 2 मार्च 2024 रोजी गुजरातमधील गिरनार शिखर (3,666 फूट) हेही त्याने अवघ्या 5 तास 1 मिनिटांत पार करत सर्वांना थक्क केले.

4/5
रायाजीच्या कळसूबाई आणि साल्हेर मोहिमांची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये झाली असून, गिरनार मोहिमेची नोंद वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये होण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती वडील सुधीर घारे यांनी दिली.

5/5
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील 350 हून अधिक गड-किल्ले रायाजीने पाहावेत आणि त्यांचा अनुभव घ्यावा, हे आमचे स्वप्न आहे. त्याच्या या कामगिरीमुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना प्रेरणा मिळत आहे, असं सुधीर घारे यांचे स्वप्न असून त्यांचा हा छोटा मावळा तो लवकरच पूर्ण करेल असा विश्वास रायाजीच्या आई-वडिलांना आहे.

PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement