advertisement

'हिला पहिले हाकला...', IPL प्रेझेंटरचं पाकिस्तान प्रेम उफाळलं, साहिबा बाली हे काय बोलली?

Last Updated:

फिल्म अभिनेत्री साहिबा बाली आयपीएल 2026 मध्ये स्पोर्ट्स प्रेझेंटर म्हणून काम करत आहे, पण साहिबाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामुळे साहिबा वादात सापडली आहे.

'हिला पहिले हाकला...', IPL प्रेझेंटरचं पाकिस्तान प्रेम उफाळलं, साहिबा बाली हे काय बोलली?
'हिला पहिले हाकला...', IPL प्रेझेंटरचं पाकिस्तान प्रेम उफाळलं, साहिबा बाली हे काय बोलली?
मुंबई : फिल्म अभिनेत्री साहिबा बाली आयपीएल 2026 मध्ये स्पोर्ट्स प्रेझेंटर म्हणून काम करत आहे, पण साहिबाचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये साहिबा द काश्मीर फाईल्स या चित्रपटावर टीका करत आहे. आयपीएल सुरू होताच साहिबा बालीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा चित्रपट वाईट असून या चित्रपटात प्रोपोगेंडा चा नरेटिव्ह आहे, असं साहिबा बाली म्हणत आहे. हा व्हिडिओ 2023 सालचा असल्याचं सांगण्यात येत आहे.

साहिबा बालीकडून पाकिस्तानचं कौतुक

याचसोबत साहिबा बालीचा आणखी एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे, या व्हिडिओमध्ये साहिबा तिच्या पाकिस्तान ट्रिपबद्दल सांगत आहे. 'पाकिस्तान ट्रिपने माझे डोळे उघडले. 2005 सालची ही गोष्ट आहे, मी टीन एजर होते. पाकिस्तानबद्दल माझा दृष्टीकोन तोच होता जो मीडिया, फिल्म आणि क्रिकेट मॅचमध्ये असतो. जेव्हा मी तिथे गेले तेव्हा माझा दृष्टीकोन पूर्णपणे बदलला. तिथले लोक खूप प्रेमळ आहेत. मी हिंदुस्तानमधून आले आहे, हे समजताच ते खूपच खूश झाले', असं साहिबा बाली म्हणाली.
advertisement
advertisement

साहिबाच्या व्हिडिओवरून वाद

साहिबा बालीचे हे दोन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, तसंच तिला ट्रोलही केलं जात आहे. एवढंच नाही तर बीसीसीआयने साहिबा बालीची आयपीएलमधून हकालपट्टी करावी, अशी मागणी चाहते करत आहेत.
advertisement
चित्रपट दिग्दर्शक अशोक पंडित यांनीही साहिबा बालीच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. 'लोकप्रिय अभिनेते आणि स्टँड-अप कॉमेडियन सायरस ब्रोचाचं पॉडकास्ट पाहून मी हैराण झालो. सायरस साहिबा बालीची मुलाखत घेत होता, जी स्वत: काश्मिरी पंडित आहे. काश्मिरी पंडीत म्हणून मी त्या दोघांचाही निषेध करतो आणि त्यांच्या माफीची मागणी करतो. त्यांनी नरसंहाराची मस्करी आणि उपहास केला', असं अशोक पंडित म्हणाले.
advertisement
advertisement

साहिबा बालीचं काश्मीर कनेक्शन

साहिबा बालीचे वडील काश्मिरी शीख आहेत. साहिबाचा जन्म कोलकातामध्ये झाला, तिने अनेक चित्रपट आणि वेब सीरिजमध्येही काम केलं आहे. साहिबा लैला मजनू आमि अमर सिंग चमकीलामध्ये दिसली, तसंच तनाव सीरिजमध्येही साहिबाने भूमिका केली आहे. आयपीएलशिवाय शार्क टँक इंडिया हा शो देखील साहिबाने होस्ट केला. आयपीएलच्या मागच्या मोसमात साहिबा पंजाब किंग्ससोबत होती. पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यरसोबत अनेक स्टार खेळाडूंच्या मुलाखती साहिबाने घेतल्या होत्या. इन्स्टाग्रामवर साहिबा बालीचे 8 लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
'हिला पहिले हाकला...', IPL प्रेझेंटरचं पाकिस्तान प्रेम उफाळलं, साहिबा बाली हे काय बोलली?
Next Article
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement