उन्हाळ्यात मोबाईल करेल घात, शरिरावर होतो असा परिणाम, एकदा वाचाच!
- Published by:Mohan Najan
- local18
Last Updated:
मोबाईल जास्त बघितल्याने डोळे खराब होतात हे माहिती आहेच. पण हाच मोबाईल जास्त प्रमाणात बघितल्यास रोजच्या जगण्यावरही परिणाम होतो. त्यातच सध्या उन्हाळा सुरू आहे. उन्हाळ्यात अनेकजण घराबाहेर न पडता घरातच मोबाईल पाहत असतात.
मोबाईल हा प्रत्येकाच्या आयुष्याचा भाग बनला आहे. त्यामुळे अनेक जण सोशल मीडियावर सक्रिय असतात. जास्तीत जास्त वेळ हा स्क्रीन बघण्यामध्ये घालवला जातो. मोबाईल जास्त बघितल्याने डोळे खराब होतात हे माहिती आहेच. पण हाच मोबाईल जास्त प्रमाणात बघितल्यास रोजच्या जगण्यावरही परिणाम होतो. त्यातच सध्या उन्हाळा सुरू आहे. उन्हाळ्यात अनेकजण घराबाहेर न पडता घरातच मोबाईल पाहत असतात.
advertisement
advertisement
डॉ. सचिन पवार सांगतात की, आपण पाहतो की अनेक लोक हे तणाव कमी करण्यासाठी मोबाईल बघत असतात. पण इंटरनेटवर काहीतरी वाचणे, बराच वेळ फोन वापरणे, झोप न लागणे अशा कारणांमुळेही फोनचा ताण येऊ शकतो. त्यामुळे मोबाईलच्या अतिवापरामुळे शरीरावर अनेक दुष्परिणाम दिसून येतात. यामुळे डोळे दुखणे, झोपेचे विकार होतात. तर मानसिक आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो. तसेच यामुळे डोकेदुखीचाही त्रास होऊ शकतो.
advertisement
advertisement








