advertisement

शिंदेसेनेच्या जिल्हाध्यक्षाला अटक, बीड पोलिसांची मोठी कारवाई; 10 वर्षापूर्वी केलं होतं मोठं कांड

Last Updated:

एकनाथ शिंदे शिवसेनेचा हा नेता जिल्हाध्यक्ष असून गेल्या 10 वर्षापासून फरार होता. अखेर पोलिसांनी सापळा रचत बेड्या ठोकल्या आहेत.

News18
News18
बीड : बीडमधून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. शिवसेना शिंदे गटाच्या बड्या नेत्याला पोलिसांनी अटक केली आहे. शिंदे शिवसेनेचा हा नेता जिल्हाध्यक्ष असून गेल्या 10 वर्षापासून फरार होता. पोलिसांनी त्याला अटकेनंतर कोर्टात हजर केले. कोर्टाने त्याला दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. या कारवाईमुळे बीडच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, शिवसेनाा शिंदे गटाच्या अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष बाबू सुब्रमण्यम कांबळतला पोलिसांनी अटक केली आहे. गेली 10 वर्षे पोलिसांना गुंगारा देत फरार होता. अंभोरा पोलिसांनी ही कारवाई केली आहे. 2016 साली पवन ऊर्जा प्रकल्पावरील मजुरावर प्राणघातक हल्ला करण्यात होता त्या हल्ल्याचा बाबू सुब्रमण्यम कांबळत हा मुख्य आरोपी होता. मंगळवारी पोलिसांनी सापळा रचून कांबळतला बेड्या ठोकल्या. या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी आधीच अटक केली होती. आष्टी न्यायालयाने बाबू सुब्रमण्यम कांबळतला 2 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. या अटकेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
advertisement

नेमकं काय आहे प्रकरण? 

10  वर्षापूर्वी आष्टी तालुक्यातील सावरगाव येथील पवन ऊर्जा प्रकल्पावर काम करणाऱ्या मजूर अनिल म्हस्के यांच्यावर 12 जणांच्या टोळीने प्राणघातक हल्ला केला होता. या प्रकरणात बाबू सुब्रमण्यम कांबळत हा मुख्य आरोपी होता. या हल्ल्यानंतर सर्व आरोपी फरार झाले होते. बाबू सुब्रमण्यम कांबळतने केलेल्या हल्ल्यात अनिल म्हस्के गंभीर जखमी झाले होते. या प्रकरणी अंभोरा पोलिस ठाण्यात 12 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दहा वर्षांपूर्वीच्या या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी कांबळत फरार झाला होता.
advertisement

फरार असताना देखील शिंदेसेनेचा जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत

दरम्यान, बाबू सुब्रमण्यम कांबळत फरार असताना देखील त्याची राजकीय कारकीर्द सुरूच होती. फरार असताना देखील तो शिंदेसेनेचा अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत होता. बाबू सुब्रमण्यम कांबळत हा अनेक प्रचारसभांमध्ये दिसला होता. आरोप सगळीकडे फिरत होता तरी देखील पोलिस त्याला अटक करत नव्हते. त्यामुळे त्याला राजकीय वरदहस्त होता की काय? अशी चर्चा सध्या सुरू आहे.
advertisement

टायरवाले नाव कसं पडलं? 

मूळचा केरळमधील मात्र टायर व्यावसायाच्या निमित्ताने नगरला आलेला बाबूशेठ येथेच स्थायिक झाला. शिवसेनेच्या माध्यमातून त्यांनी राजकारणात प्रवेश केला होता. एकनाथ शिंदेंनी टायरवाले याच्याकडे राहुरी, शेवगाव, कर्जत, जामखेड या तालुक्यांची जबाबदारी दिली होती.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
शिंदेसेनेच्या जिल्हाध्यक्षाला अटक, बीड पोलिसांची मोठी कारवाई; 10 वर्षापूर्वी केलं होतं मोठं कांड
Next Article
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement