advertisement

डोंबिवलीचा रील स्टार निघाला गँगस्टार; घरात सापडला अवैध शस्त्रसाठा,अशा ठिकाणी लपवला होता की पोलीसही चक्रावले

Last Updated:

. बलात्काराच्या प्रकरणात जामिनार बाहेर आळ्यानंतर त्याच्याकडून मोठा शस्त्रसाठा आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

News18
News18
ठाणे : डोंबिवलीतील दावडी परिसरात राहणाऱ्या कुख्यात रिल स्टार सुरेंद्र पाटील याच्या घरातून कल्याण क्राईम ब्रांच पोलिसांनी मोठा हत्यारांचा साठा जप्त केला आहे. ⁠महागड्या हत्यारंसह रिल स्टार सोशल मीडियावर दहशत माजवत होता. ⁠सोशल मिडियावर कुप्रसिद्ध असलेल्या रिल स्टारला ठाणे क्राईम ब्रान्चने अटक केली आहे. बलात्काराच्या प्रकरणात जामिनार बाहेर आळ्यानंतर त्याच्याकडून मोठा शस्त्रसाठा आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार पोलिसांनी सुरेंद्र पाटीलच्या घराची झडती घेतली असता त्याच्या घरात 3 देशी बनावटीच्या पिस्टल, 1 सिक्सर रिव्हॅालवर, 7 गावठी कट्टे, 2 एअर गन, 405 जिवंत काडतुसे, जिवंत 167 छर्रे, 2 तलवार, 3 लोखंडी कोयते, 1 सुरा, 2 चाकू, लोखंडी रॅाड, आणि 3 लाख 20 हजार रुपये रोख जप्त करण्यात आले आहे. रिल स्टार सुरेंद्र पाटीलावर तब्बल 12 पेक्षा जास्त गंभीर गुन्हे दाखल आहेत. डोंबिवली मानपाडा पोलिस स्टेशनमध्ये पोलिस अधिका-यांच्या खुर्चीवर बसून सुरेंद्रने रील बनवली होती. ⁠तर एका मुलीच्या विनयभंगाचा गुन्हा देखील सुरेंद्रवर दाखल आहे.
advertisement

एवढा मोठा साठा नेमका कशासाठी आणला होता?

महत्त्वाचे म्हणजे सुरेंद्रने शस्त्रसाठी लपवण्यासाठी चपलांच्या स्टँडसाठी एक गुप्त कप्पा तयार केला होता. हा कप्पा अशा पद्धचतीने बनवसा होता की, कोणालाही संशय येऊ नये याची खबरदारी पूर्णपणे घेतली होती. चप्पल स्टँडच्या कप्प्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा सापडल्याने हा शस्त्रसाठी नेमका कोणाचा होता? काही मोठा कट असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच हा साठा वैयक्तित होतातर एवढा मोठा साठा नेमका कशासाठी आणला होता? कोणाकडून आणला होता? यामागे कोणत्या बड्या व्यक्तीचा हाच होता का याचा पोलीस तपास करत आहे.
advertisement

पोलिसांकडून लवकरच आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता

सुरेंद्र पाटील याआधीही वादग्रस्त रील्समुळे चर्चेत आला होता. त्याच्या सोशल मीडियावरील अ‍ॅक्टिव्हिटीमुळे अनेकदा वाद निर्माण झाले होते. आता या कारवाईनंतर त्याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणात पुढील तपास सुरू असून, पोलिसांकडून लवकरच आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
view comments
मराठी बातम्या/ठाणे/
डोंबिवलीचा रील स्टार निघाला गँगस्टार; घरात सापडला अवैध शस्त्रसाठा,अशा ठिकाणी लपवला होता की पोलीसही चक्रावले
Next Article
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement