advertisement

इंडस्ट्री हादरली! फिल्मच्या सेटवर अभिनेत्रीसोबत संतापजनक प्रकार, बड्या डायरेक्टरला पोलिसांच्या बेड्या

Last Updated:

Director Renjith Controversy: ग्लॅमरच्या झगमगाटामागील एक काळा चेहरा सर्वांसमोर आला असून सिनेसृष्टी सध्या या प्रकरणाने हादरली आहे. एका प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या कृत्याने संपूर्ण देश सुन्न झाला आहे.

News18
News18
कोची: सिनेसृष्टी ही वरून जितकी आकर्षक आणि ग्लॅमरस वाटत असली, तरीही या इंडस्ट्रीमध्ये किती वाईट गोष्टी घडत असतात, ते या इंडस्ट्रीमध्ये काम करत असलेल्यांनाच माहीत असतं. या इंडस्ट्रीतील महत्त्वाची समस्या म्हणजे कास्टिंग काऊच. याबद्दल तुम्ही अनेक घटना ऐकल्या असतील. मात्र, नुकतंच समोर आलेल्या एका प्रकरणाने सर्वांनाच थक्क केलं आहे. ग्लॅमरच्या झगमगाटामागील एक काळा चेहरा सर्वांसमोर आला असून मल्याळम सिनेसृष्टी सध्या या प्रकरणाने हादरली आहे. एका प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या कृत्याने संपूर्ण देश सुन्न झाला आहे.
दिग्दर्शकाने चित्रपटाच्या सेटवरच अश्लील चाळे आणि बलात्काराचा प्रयत्न केल्याचा आरोप एका अभिनेत्रीने केला आहे. हा दिग्दर्शक दुसरा कोणी नसून रंजीत आहे. अभिनेत्रीच्या तक्रारीनंतर त्याला अटक करण्यात आली असून या घटनेने मल्याळम इंडस्ट्रीमध्ये एकच खळबळ उडाली आहे. एर्नाकुलम पोलिसांनी मंगळवारी संध्याकाळी मोठ्या शिताफीने रंजीतच्या मुसक्या आवळल्या आहेत.

पोलिसांच्या सापळ्यात अडकला रंजीत

advertisement
मंगळवारी रंजीत एर्नाकुलममधून थोडुपुझाच्या दिशेने पळून जाण्याच्या तयारीत असतानाच, एर्नाकुलम पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार एका विशेष पथकाने त्याला मुत्तथु येथे गाठलं आणि बेड्या ठोकल्या. यानंतर त्याला कोची पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं असून न्यायालयाने त्याला १४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. विशेष म्हणजे पीडित अभिनेत्रीने तक्रार केल्याच्या अवघ्या २४ तासांनी पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे.
advertisement

फिल्मच्या सेटवर रंजीतचं अभिनेत्रीशी गैरवर्तन

दरम्यान, एर्नाकुलम पोलीस आयुक्त कलिराज महेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, रंजीतने पीडित महिलेसोबत शूटिंगच्या सेटवरच गैरवर्तन केलं. यानंतर संबंधित अभिनेत्री तडक तिथून बाहेर आली आणि रडत रडत जवळच्या व्यक्तीकडे घडलेला सर्व प्रकार सांगितला. या घटनेनंतर पीडित अभिनेत्री इतकी हादरली होती की ती तक्रार दाखल करायलाही तयार नव्हती. ती मानसिकदृष्ट्या पूर्णपणे कोलमडली होती. अखेर तिचं समुपदेशन केल्यानंतर तिला कायदेशीर लढाईसाठी तयार करण्यात आलं.
advertisement

FEFKA मधून रंजीतचं निलंबन

दरम्यान, पोलिसांनी या तक्रारीची तात्काळ दखल घेत रंजीतला अटक केली. या तक्रारीनंतर रंजीतच्या समस्या आणखीनच वाढल्या आहेत. रंजीत 'फिल्म एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ केरला' (FEFKA) या संघटनेचा सदस्य आहे. मात्र, या तक्रारीनंतर त्याचं निलंबन करण्यात आलं आहे. फेफकाचे सरचिटणीस बी. उन्नीकृष्णन यांनी स्पष्ट केलं की, महिलांच्या सुरक्षिततेच्या बाबतीत कोणतीही तडजोड केली जाणार नाही आणि रंजीतवर कठोर संघटनात्मक कारवाई केली जाईल.
advertisement

याआधीही रंजीतवर दाखल झाले आहेत गुन्हे

तथापि, हे पहिल्यांदा नाही जेव्हा रंजीतने महिलांसोबत अशाप्रकारचे वर्तन केले आहे. तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर आली असून त्यानुसार, रंजीत विरोधात अशाच प्रकारचे आणखी दोन गुन्हे आधीच दाखल आहेत. वारंवार अशा घटना घडत असतानाही तो सिनेसृष्टीत कसा टिकून होता, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. रंजीतने जामिनासाठी अर्ज केला असला तरी, त्याच्यावर असलेल्या गंभीर आरोपांमुळे त्याला दिलासा मिळण्याची शक्यता धूसर आहे.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
इंडस्ट्री हादरली! फिल्मच्या सेटवर अभिनेत्रीसोबत संतापजनक प्रकार, बड्या डायरेक्टरला पोलिसांच्या बेड्या
Next Article
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement