चिपळूण हादरलं! साडीवरून ओळख पटली, 70 वर्षीय वृद्ध महिलेसोबत गाणेच्या जंगलात नेमकं काय घडलं?
- Published by:Prachi Amale
Last Updated:
जंगलातून लाकडाची फाटी आणण्यासाठी गेला होता त्यावेळी त्याला एक मृतदेह जळालेल्या स्थितीत दिसून आला.
राजेश जाधव, प्रतिनिधी
चिपळूण : तालुक्यातील गाणे-खडपोली परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून वणव्यात होरपळून एका 70 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. तारामती तुकाराम वाघे असे मृत महिलेचे नाव आहे. 27 मार्चपासून सदरची महिला बेपत्ता होती.
मिळालेल्या माहितीनुसार, तारा वाघे या चार पाच दिवसापासून बेपत्ता होत्या. त्या काही अंशी मनोरुग्ण होत्या आणि अनेकवेळा घरातून निघून जात असत तसेच परत येत असत याचदरम्यान गाणेच्या जंगलात चार दिवसापूर्वी वणवा लागला होता. एक इसम जंगलातून लाकडाची फाटी आणण्यासाठी गेला होता त्यावेळी त्याला एक मृतदेह जळालेल्या स्थितीत दिसून आला. मात्र साडीवरून त्यांनी हा मृतदेह तारामती वाघे हिचा असल्याचं ओळख पटली त्यानुसार त्यांनी अलोरे शिरगाव पोलिस यांना माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली आणि सदरच्या मृतदेह यांच्यावर शिरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले.
advertisement
नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याचे आवाहन
जंगलांमध्ये भरपूर वणवे पेटतात. उन्हाळ्यात हे प्रमाण सर्वाधिक असतं. काही वेळा हे वणवे इतके पसरतात, की त्यांना आटोक्यात आणणं हे आव्हान होतं आणि त्यामुळे खूप नुकसान सहन करावं लागतं. वणव्याच्या तीव्रतेमुळे त्या होरपळून मृत्यूमुखी पडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.दरम्यान या घटनेमुळे वणव्याच्या वाढत्या घटनांबाबत चिंता व्यक्त केली जात असून नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
advertisement
जंगलात वणवा लावण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर
उन्हाळा सुरू झाला की, पावसाळ्यानंतर चांगले गवत उगवावे यासाठी जंगलात वणवा लावण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर घडत असतात. जंगलात गवत पेटवणे हे पर्यावरणाला धोकादायक आणि कायदेशीर गुन्हा आहे. जंगलातील जैवविविधतेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Apr 01, 2026 6:02 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
चिपळूण हादरलं! साडीवरून ओळख पटली, 70 वर्षीय वृद्ध महिलेसोबत गाणेच्या जंगलात नेमकं काय घडलं?








