advertisement

दारावर टकटक, पण आतून प्रतिसाद नाही, पोलिसांनी गेटवरून उड्या मारल्या, खरातच्या पोराला सिनेस्टाईल अटक

Last Updated:

अशोक खरात याने पुजा आणि अध्यात्माच्या नावाने शेकडो कोटींची माया जमवल्याचे समोर आले आहे. त्याच्या कारनाम्यांमध्ये त्याला कुटुंबाची साथ होती का? याचा तपास पोलिसांना करायचा आहे.

अशोक खरात याच्या मुलाला अटक
अशोक खरात याच्या मुलाला अटक
नाशिक : नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याला न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. महिलांवरील लैंगिक अत्याचार, फसवणूक, जादूटोणा अशा विविध कलमान्वये त्याच्यावर गुन्हे दाखल झाले असून विशेष पोलीस पथकाकडून त्याची चौकशी सुरू आहे. चौकशीत खरात याच्यासोबत अनेक लोकांचे कनेक्शन समोर येत असल्याने दिवसेंदिवस तपासाची व्याप्तीही वाढली आहे. अशोक खरात याच्या मुलासंदर्भाने विशेष माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला सिनेस्टाईल पद्धतीने ताब्यात घेतले.
नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याच्या कारनाम्यांनी महाराष्ट्र हादरला आहे. राजकीय नेते, दिग्गज मंत्री, अनेक सनदी अधिकारी, नावाजलेले पोलीस अधिकारी, डॉक्टर, निष्णात वकील, व्यावसायिक आदी मंडळींना अशोक खरात याने आपली भुरळ पाडली होती. पुजा आणि अध्यात्माच्या नावाने खरातने शेकडो कोटींची माया जमवल्याचे समोर आले आहे. त्याच्या कारनाम्यांमध्ये त्याला कुटुंबाची साथ होती का? याचा तपास पोलिसांना करायचा आहे.
advertisement

खरातच्या पोराला सिनेस्टाईल अटक

एरवी अशोक खरात याचा बंगला गजबजून गेलेला असायचा. मात्र त्याला अटक केल्यानंतर नाशिकमधील त्याच्या कर्मयोगी नगर येथील खरातच्या तृप्तबाला बंगल्याच्या बाहेर शुकशुकाट आहे. खरात याच्या कारनाम्यांमध्ये कुटुंबाची काय भूमिका आहे, हे तपासण्यासाठी पोलिसांनी त्याच्या मुलाला ताब्यात घेतले. विशेष पोलीस पथकातील तीन महिला आणि एका पुरुष अधिकाऱ्याने तृप्तबाला बंगल्याचे दार उघडण्याचा प्रयत्न केला, दार ठोठावले पण खरात याच्या कुटुंबाकडून त्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
advertisement
अनेकदा आवाज देऊनही, दार ठोठावूनही आतून प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून पोलीस अधिकाऱ्यांनी शेजारी असलेल्या बंगल्याच्या कंपाऊडवरुन उडी मारून बंगल्यात प्रवेश केला आणि खरातच्या मुलाला ताब्यात घेतले.

अशोक खरातची बायको फरार

अशोक खरात याच्या पत्नीच्या अटकेची शक्यता व्यक्त होत होती. याची कुणकुण लागताच त्याची पत्नी कल्पना खरात फरार झाली आहे. विशेष पोलिसांचे पोलिसांचे पथक कर्मयोगीनगर परिसरातील तृप्तबाला बंगल्यावर पोहोचले होते. मात्र अटकेची कुणकुण लागताच ती फरार झाली, असे सूत्रांनी सांगितले.
advertisement

अशोक खरात याचे राजकीय कनेक्शन

नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याचे हायप्रोफाईल राजकारणी, बडे अधिकारी, उद्योजक आणि कलाकार यांच्याशी अत्यंत जवळचे संबंध समोर आले आहेत, ज्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. खरात याच्या संपर्कात अनेक क्षेत्रांतील प्रभावशाली व्यक्ती होत्या. यामध्ये राजकीय क्षेत्रातील व्यक्ती, शासकीय अधिकारी, पोलीस, व्यावसायिक यांचा समावेश असल्याचे बोलले जाते.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
दारावर टकटक, पण आतून प्रतिसाद नाही, पोलिसांनी गेटवरून उड्या मारल्या, खरातच्या पोराला सिनेस्टाईल अटक
Next Article
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement