रोहित-विराट टेस्टमधून निवृत्ती मागे घेणार? BCCIला पाठवला मेसेज,व्हायरल पोस्टच सत्य काय?
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
खरं तर मागच्या वर्षीच्या आयपीएल दरम्यानच रोहित शर्माने 7 मे 2025 ला टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. रोहित पाठोपाठ विराट कोहलीने 13 मार्च 2025 रोजी निवृत्ती घेतली होती.
Rohit Sharma Virat Kohli : आयपीएल 2026च्या हंगामाला सूरूवात झाली आहे. या हंगामात एकापेक्षा एक रोमांचक सामने पार पडतायत. या लीग दरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे.टीम इंडियाचा माजी कर्णधार रोहित शर्मा आणि स्टार खेळाडू विराट कोहली टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती मागे घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.विशेष म्हणजे रोहित शर्मा आणि विराट कोहलीने बीबीसीआयला मेसेज पाठवल्याचे बोलले जात आहे.त्यामुळे रोहित आणि विराटच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. दरम्यान रोहित-विराटच्या व्हायरल पोस्टमागचं सत्य काय आहे? हे जाणून घेऊयात.
खरं तर मागच्या वर्षीच्या आयपीएल दरम्यानच रोहित शर्माने 7 मे 2025 ला टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. रोहित पाठोपाठ विराट कोहलीने 13 मार्च 2025 रोजी निवृत्ती घेतली होती.त्यामुळे टीम इंडियात मोठा भुकंप झाला होता आणि सगळ्यांनाच मोठा झटका बसला होता.
यानंतर शुभमन गिलला टेस्टचा कॅप्टन बनवण्यात आलं होतं.पण गिलच्या नेतृत्वात टीम इंडियाला टेस्टमध्ये फारशी चांगली कामगिरी करता आली नाही.तसेच रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोन्ही दिग्गजांची कमी जाणवत होती. त्यात आता दोघांच्या निवृत्तीच्या जवळ जवळ वर्षभरानंतर आता मोठी बातमी समोर आली आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली टेस्टमधून निवृत्ती मागे घेणार असल्याचे बोलले जात आहे.एका व्हायरल पोस्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे.त्यामुळे हा दावा किती खरा खोटा आहे? हे जाणून घेऊयात.
advertisement
Rohit Sharma & Virat Kohli are back from RETIREMENT #Cricket pic.twitter.com/KINBqAOeN1
— IPL X News (@IPLXNews) April 1, 2026
सोशल मिडिया पोस्टमध्ये काय?
सोशल मिडियावर बीसीसीआयचा लोगो असलेले एक पत्र व्हायरल होत आहे. या पत्रात विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोन्ही दिग्गज क्रिकेटपटूंनी टेस्टमधून निवृत्ती मागे घेण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. यासोबत आणखी एका पोस्टमअध्ये विराट कोहलीने स्वत:हून टेस्ट क्रिकेटमध्ये परतण्याची घोषणा केली आहे.तसेच मी सफेद जर्सी घालण्यास पुन्हा उत्सुक आहे, अशा देखील पोस्ट व्हायरल होत आहेत.
advertisement
सोशल मीडियावर रोहित शर्मा आणि विराट कोहली बाबत व्हायरल झालेल्या या पोस्ट खोट्या आहेत. त्यात अजिबात तथ्य नाही आहे. विराट कोहली आणि रोहित शर्माने टेस्टमधून निवृत्ती मागे घेण्याची कोणतीही इच्छा व्यक्त केली नाही आहे.त्याचसोबत बीसीसीआयने अशाप्रकारचे कोणतेही पत्रक जारी केले नाही आहे.त्यामुळे या पोस्टमधील सर्व दावे खोटे आहेत.
दरम्यान रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी जरी टेस्ट आणि टी20 मधून निवृत्ती जाहीर केली असली तरी ते टीम इंडियाकडून वनडे फॉरमॅटमध्ये खेळताना दिसणार आहेत.मागच्या वर्षी या दोन्ही खेळाडूंनी वनडे फॉरमॅटमध्ये धावांचा पाऊस पडला होता. आता पुन्हा एकदा यावर्षी रोहित शर्मा आणि विराट कोहली काय धुमाकुळ घालतात?हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Apr 01, 2026 7:38 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
रोहित-विराट टेस्टमधून निवृत्ती मागे घेणार? BCCIला पाठवला मेसेज,व्हायरल पोस्टच सत्य काय?








